भोपाळमध्ये IPS अधिकाऱ्यांची बोट उलटली

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नाव (IPS officers boat capsized) एका मोठ्या तलावात उलटली.

IPS officers boat capsized, भोपाळमध्ये IPS अधिकाऱ्यांची बोट उलटली

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नाव (IPS officers boat capsized) एका मोठ्या तलावात उलटली. या नावेत आयपीएस अधिकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही होते. मध्य प्रदेशचे डीजीपी विजयकुमार सिंह यांची पत्नीही या नावेत होती. एका कार्यशाळेसाठी सर्व आयपीएस अधिकारी जमले होते. त्यावेळी वॉटर्स स्पोर्ट्सदरम्यान, (IPS officers boat capsized) ही घटना घडली. नाव पलटल्यानंतर आजूबाजूच्या अन्य बोटींद्वारे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, सर्व अधिकाऱ्यांनी लाईफ जॅकेट्स घातले होते, अशी माहिती एडीजी विजय कटारिया यांनी दिली. प्रत्येकवेळी आयएएस आणि आयपीएस कार्यशाळेदरम्यान, विविध क्रीडास्पर्धाही होतात. ज्यामध्ये सुरक्षेची काळजी घेतली जाते, असं कटारिया यांनी सांगितलं.

पहिल्या दिवशी क्रिकेट सामने

भोपाळमध्ये आयपीएस मीट 2020 सुरु आहे. यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मोतीलाल नेहरु स्टेडियमवर आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेट सामना झाला.  डीजीपी व्ही के सिंह आणि एडीजी श्रीनिवास राव यांच्या संघात सामना रंगला. या सामन्यात आयजी योगेश चौधरी यांना सामनावीराचा किताब मिळाला.

अधिकाऱ्यांचा जल्लोष

या सामन्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथही उपस्थित होते. कमलनाथ म्हणाले, “आजपर्यंत पोलिसांनी अनेकांना नाचवताना पाहिलं आहे, मात्र आज नाचताना पहिल्यांदाच पाहात आहे”

सर्वोत्तम डान्ससाठी पोलीस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *