दगड फेकले, दरीत ढकलण्याचा प्रयत्न; पोलिसासमोरच मुंबईतील पर्यटकावर हल्ला, भयानक घडलं

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरण्यात मुंबईहून उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या व्यक्तीसोबत भंयकर घडले. त्याच्यावर पोलिसांसमोर दगडाने हल्ला करण्यात आला.

दगड फेकले, दरीत ढकलण्याचा प्रयत्न; पोलिसासमोरच मुंबईतील पर्यटकावर हल्ला, भयानक घडलं
Tourist
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 6:56 PM

मे महिना म्हटलं की सर्व मुलांना शाळांना सुट्ट्या असतात. या काळात अनेक पालक फिरायला जाण्याचा प्लान करतात. पण उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील काही पर्यटकांना अत्यंत धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागल्याची माहिती समोर आली आहे. मसुरी आणि कनाताल परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर कथितरित्या स्थानिक वाहतूक सेवा पुरवणाऱ्या काही व्यक्तींनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका पर्यटकासह त्यांच्या ज्येष्ठ नागरिक वडिलांना मसुरी–कनाताल महामार्गावरील सुरकांडा माता मंदिर परिसरात अडवण्यात आले. यावेळी पर्यटकांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यटकांनी विरोध केल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि त्यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना तिथल्या पोलिसा समोर घडली असून आरोपींनी पर्यटकांना डोंगराच्या खोल दरीत ढकलून देण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीवर दगडाने हल्ला झाला तो पोलिसांकडे मदत मागताना दिसत आहे. तसेच दगड फेकून बळजबरी कराणी व्यक्ती पोलिसांच्या समोर उभी असल्याचे दिसत आहे. तरी देखील पोलिसांनी यावर कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही.

स्थानिक व्हेंडरकडून हा प्रकार

त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेनंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Follow Us