Nana Patekar Heart Attack: नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला ही कार्डियक अरेस्ट? जाणून घ्या CPR कसा द्यायचा?

Nana Patekar Heart Attack: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर CPR कसा द्यावा, कोणती काळजी घ्यावी वाचा...

Nana Patekar Heart Attack: नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला ही कार्डियक अरेस्ट? जाणून घ्या CPR कसा द्यायचा?
Nana Patekar heart attack
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 11:48 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधनाने झाले. त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री नाना यांना छातीत दुखत होते. असह्य वाटत होते. त्यानंतर ते बेशुद्ध झाले होते. जवळपास डॉक्टरांच्या एका टीमने 45 मिनिटे CPR दिला. आज आपण जाणून घेणार आहोत की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये किती फरक आहे आणि CPR कसे दिले जाते.

हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये काय फरक असतो?

Loading...

हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे दोन्ही वेगवेगळे असतात. हार्ट अटॅक तेव्हा होतो जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या कोणत्याही नसेमध्ये अडथळा येतो, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही. तर कार्डियक अरेस्टमध्ये हृदय अचानक धडधडणे थांबवते, ज्यामुळे शरीर आणि मेंदूला रक्त पोहोचणे बंद होते. हार्ट अटॅकमध्ये व्यक्ती सहसा शुद्धीत राहू शकते आणि श्वास घेत राहते, तर कार्डियक अरेस्टमध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होते आणि सामान्यपणे श्वास घेणेही बंद करते.

कार्डियक अरेस्टची खास लक्षणे काय असतात

कार्डियक अरेस्ट नेहमी अचानक येतो, त्यामुळे लक्षणे तात्काळ दिसू शकतात. अशावेळी माणूस अचानक बेशुद्ध होतो, चक्कर येते किंवा धाप लागते. याशिवाय कार्डियक अरेस्टपूर्वी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जलद किंवा अनियमित धडधड, चक्कर येणे किंवा अचानक अशक्तपणा यांसारखी लक्षणेही दिसू शकतात.

CPR देण्याची पद्धत जाणून घ्या

१. छातीवर हात ठेवा: व्यक्तीला पाठ वर करून सपाट आणि कठीण जागेवर आडवे करा. एका हाताच्या तळहाताचा खालचा भाग छातीच्या मध्यभागी म्हणजे छातीच्या हाडावर ठेवा आणि दुसरा हातावर ठेवा.

२. छाती दाबा: कोपर सरळ ठेवत छातीच्या मध्यभागी जोरात आणि जलद दाबा. एका मिनिटात १०० ते १२० वेळा छाती दाबावी. प्रत्येक दाबानंतर छाती पूर्णपणे सामान्य स्थितीत परत येऊ द्या. प्रौढ व्यक्तीमध्ये छाती सुमारे ५ ते ६ सेंटीमीटर दाबावी.

३. मदत येईपर्यंत सुरू ठेवा: जर तुम्हाला CPR देण्याचे प्रशिक्षण असेल तर ३० वेळा छाती दाबल्यानंतर २ वेळा तोंडाने श्वास द्या. जर प्रशिक्षण नसेल किंवा तोंडाने श्वास देऊ शकत नसाल तर फक्त छाती दाबत राहा. वैद्यकीय मदत येईपर्यंत किंवा व्यक्ती सामान्यपणे श्वास घेईपर्यंत CPR सुरू ठेवा.

मेडिकल टीमला कॉल करा

जर अचानक कोणाला कार्डियक अरेस्ट आला तर उशीर न करता मेडिकल टीमला कॉल करा. त्यांना AED (Automated External Defibrillator) मशीन आणण्यास सांगा. जेव्हा CPR ने शुद्धी येत नाही तेव्हा AED वापरले जाते, ज्यात छातीवर शॉक दिला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us