कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना सूचना

Corona Virus : कोरोनाचा नवीन कोविड प्रकार JN.1 प्रकार केरळमध्ये आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना जारी केल्या आहेत. रुग्णालयांबाबत मंत्रालयाने आयोजित केलेल्या ड्रिलमध्ये सहभागी व्हावे, असे म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि सिंगापूरमध्ये हा नवीन प्रकार आढळला होता. त्यानंतर भारतात आढळला होता.

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना सूचना
| Updated on: Dec 19, 2023 | 3:39 PM

Corona Update : कोरोनाने पुन्हा एकदा हळूहळू डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना गाईडलाईन्स जारी केली आहे. चीन, सिंगापूर आणि अमेरिकेनंतर भारतात आढळलेल्या JN.1 या नवीन प्रकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना निर्देश

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ILI आणि SARI रुग्णांची स्थिती दररोज जिल्हा स्तरावर नोंदवली जावी. याशिवाय जिल्हानिहाय पुरेशा संख्येत चाचणी वाढवा. जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी RT-PCR पॉझिटिव्ह नमुने पाठवा जेणेकरून नवीन प्रकारांची उपस्थिती शोधता येईल.

मृतांचा आकडा वाढल्याची शक्यता किती?

राज्यांना जारी करण्यात आलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये आरोग्य मंत्रालयाने त्यांना रुग्णालयांबाबत मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या ड्रिलमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. नवीन प्रकार JN.1 हा ओमिक्रॉनचा उप वंश आहे आणि तो स्पाइक प्रोटीनमधील उत्परिवर्तनामुळे तयार झाला आहे. यामुळे केसेस वाढू शकतात असे संकेत आहेत आणि म्हणूनच जीनोमिक सिक्वेन्सिंगवर अधिक भर दिला जात आहे. अद्याप याला फार धोकादायक मानत नाहीत, कारण आतापर्यंत यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले नाही.

चीन, यूके आणि यूएसए मध्ये आढळला नवा प्रकार

कोविड JN.1 चे नवीन प्रकार चीन, यूके आणि यूएसएमध्ये आढळले आहेत. जुलैपासून हा प्रकार आढळून आला आहे. या उत्परिवर्तनामुळे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. पण याबाबत अजून कोणतेही अधिकृत चिन्ह दिसलेले नाही.

काही देशांमधील डेटा सूचित करतो की JN.1 मुळे प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. भारत अजून वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहेत. कारण आतापर्यंत फक्त एकच रुग्ण आढळला आहे. प्रत्येक देशाच्या लोकसंख्येची स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग किती आहे हे अद्याप पुढे आलेले नाही.