Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असताना दिसत आहेत. त्यामुळे चला जाणून घेऊया आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाले आहेत का?

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?
petrol-diesel
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 8:27 AM

आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत असताना दिसत आहेत. त्यामुळे इंधनाच्याही किंमतीही सतत बदलताना दिसत आहेत. याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना दिसत आहे. चला जाणून घेऊया आज, 20 सप्टेंबर रोजी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती किती आहेत?

आज रविवार, २० सप्टेंबरला देशभरात इंधनाच्या किंमती स्थिर आहेत आणि बहुतेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या देशात पेट्रोलची सरासरी किंमत १११.२१ रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १११.२१ रुपये प्रति लिटर आहे, जी मागील दिवसाच्या रेटइतकीच आहे. येथे डिझेलची किंमत ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे, जी कालच्या रेटइतकीच आहे. दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.२ रुपये प्रति लिटर आहे, जे इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे.

शहरानुसार किंमती तपासा

शहर पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) डिझेलची किंमत (प्रति लिटर)
दिल्ली १०२.१२ रुपये ९५.२० रुपये
मुंबई १११.३१ रुपये ९७.९७ रुपये
इंदोर ११४.५८ रुपये ९९.७० रुपये
चेन्नई १०७.७८ रुपये ९९.५६ रुपये
जयपूर ११२.६९ रुपये ९७.७८ रुपये
पटना ११३.३५ रुपये ९९.३६ रुपये
नागपूर १११.९० रुपये ९८.२० रुपये
देहरादून १०३.५४ रुपये ९५.९३ रुपये
आग्रा १०१.६६ रुपये ९५.०२ रुपये

आज क्रूड ऑइलची किंमत

आज रविवार असल्याने ICE आणि NYMEX सारखे कमोडिटी मार्केट बंद असतात, त्यामुळे किंमती आधीच्या पातळीवर कायम आहेत. म्हणजे शुक्रवार (१८ सप्टेंबर) रोजी मार्केट बंद झाल्यावेळी जेवढ्या किंमती होत्या, तेवढ्याच आहेत. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमती मागील काही दिवसांच्या तेजीनंतर सुमारे १% घसरून बंद झाल्या होत्या. त्या दिवशी ब्रेंट क्रूड सुमारे ०.९१% घसरून १०३.८७ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले होते. ब्रेंट क्रूडची किंमत १०४ डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्याने गेल्या आठवड्यात इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात स्थिर राहिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us