AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर.

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 29, 2020 | 7:25 AM
Share

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढती किंमत चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे सध्या प्रत्येकजण पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर लक्ष ठेवून आहे. (Petrol Diesel Price Today in Mumbai and Maharashtra)

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 90.34 इतका राहील. तर डिझेलसाठी ग्राहकांना प्रतिलीटर 80.51 रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या तुलनेत देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असल्याचे दिसत आहे.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय? दिल्ली (Delhi Petrol Price Today): 83.71 रुपये प्रति लीटर नोएडा (Noida Petrol Price Today): 83.67 रुपये प्रति लीटर गुरुग्राम (Gurugram Petrol Price Today): 81.89 रुपये प्रति लीटर लखनऊ (Lucknow Petrol Price Today): 83.59 रुपये प्रति लीटर मुंबई (Mumbai Petrol Price Today): 90.34 रुपये प्रति लीटर कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 85.19 रुपये प्रति लीटर चेन्नई (Chennai Petrol Price Today): 86.51 रुपये प्रति लीटर पाटणा (Patna Petrol Price Today): 86.25 रुपये प्रति लीटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर काय? दिल्ली (Delhi Diesel Price Today): 73.87 रुपये प्रति लीटर नोएडा ( Noida Diesel Price Today): 74.29 रुपये प्रति लीटर गुरुग्राम (Gurugram Price Today): 74.44 रुपये प्रति लीटर लखनऊ (Lucknow Diesel Price Today): 74.21 रुपये प्रति लीटर मुंबई (Mumbai Diesel Price Today): 80.51 रुपये प्रति लीटर कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 77.44 रुपये प्रति लीटर चेन्नई (Chennai Diesel Price Today): 79.21 रुपये प्रति लीटर पाटणा (Patna Diesel Price Today): 79.04 रुपये प्रति लीटर

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...