AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Bangaladesh Visit : 497 दिवसानंतर मोदींचं विमान आकाशात झेपावलं, मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 497 दिवसानंतर परदेश दौऱ्यावर गेले आहेत. आज आणि उद्या (26 आणि 27 मार्च) मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. | Pm narendra modi Bangaladesh Visit

PM Modi Bangaladesh Visit : 497 दिवसानंतर मोदींचं विमान आकाशात झेपावलं, मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर
Modi Bangaladesh Tour
| Updated on: Mar 26, 2021 | 9:31 AM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) तब्बल 497 दिवसानंतर परदेश दौऱ्यावर गेले आहेत. आज आणि उद्या (26 आणि 27 मार्च) मोदी हे बांगलादेशच्या (Pm narendra modi Bangaladesh Visit) दौऱ्यावर आहेत. बांगलादेशाचा 50 वा स्वातंत्र्य दिन, बंगबंदून शेख मुजीबुर्रहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि भारत-बांगलादेशाच्या राजकीय मैत्रीला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. (Pm narendra modi Bangaladesh Visit Attend 50 Independence Day Of bangaladesh)

26 मार्च रोजी म्हणजे आज भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदी यांचं विमान सकाळी साडे दहा वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर लॅन्ड होईल. तेव्हा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना 19 तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान एअर पोर्टवर परेडचं निरीक्षण करतील. पुढे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकसोबत सलामी मंचावर जातील.

मोदी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतील

ढाका एअरपोर्टवरुन पंतप्रधान मोदींचा ताफा थेट बांग्लादेशच्या राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाईल. तिथे पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. तसंच त्यांची आठवण म्हणून एक रोपटंही लावतील. शहीद स्मारकावरुन निघाल्यानंतर पंतप्रधान पॅन पॅसिफिक सोनारगाव हॉटेलमध्ये पोहोचतील. तिथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोंदीच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसंच मोदींच्या स्वागताची जोरदार तयारीही करण्यात आली आहे.

दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात

संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान मोदी नॅशनल परेड ग्राऊंडवर पोहोचतील. तिथे पुन्हा एकदा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना त्यांचं स्वागत करतील. ढाका इथल्या नॅशनल परेड ग्राऊंडवरच स्वातंत्र्याच्या 50 व्या सोहळाचे राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचं आगमन झाल्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर विविध धर्मग्रंथांचं वाचन होईल. त्याचबरोबर 50 व्या स्वातंत्र्यदिनाचं एक थिम साँगही असेल आणि काही व्हिडीओही दाखवले जातील.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांग्लादेशचे लिबरेशन ऑफ अफेयर्सचे मंत्री मुजम्मिल हक यांचं स्वागताचं भाषण होईल. त्याचबरोबर पंतप्रधान शेख हसीना यांच्या भगिनी रेहाना सिद्दीकी यांचंही संबोधन होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचं सबोधन होईल. मान्यवरांची भाषणं झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांचे दाखले सांगणारा कार्यक्रम होणार आहे.

प्रवासी लोकलला मोदी हिरवा कंदील दाखवण्याचीही शक्यता

भारताच्या नेबरहूड फर्स्ट अँड अॅक्ट ईस्ट पॉलिसीच्या अंतर्गत भारत-बांगलादेशाच्या दरम्यानचे नातेसंबंध मजबूत झालेले आहेत. भारताने बांगलादेशाला आतापर्यंत कोरोनाचे 90 लाख डोस दिले आहेत. भारताकडून आतापर्यंत कोणत्याही इतर देशांना पाठवण्यात आलेले हे सर्वाधिक कोरोना डोस आहेत. या दौऱ्या दरम्यान बांगलादेशची राजधानी ढाका आणि पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी दरम्यान धावणाऱ्या प्रवासी लोकलला मोदी हिरवा कंदील दाखवण्याचीही शक्यता आहे.

(Pm narendra modi Bangaladesh Visit Attend 50 Independence Day Of bangaladesh)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.