अयोध्येत मोदी म्हणाले जय श्री राम, पण राम मंदिराबाबत चकार शब्द नाही!

अयोध्या (उत्तर प्रदेश) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय पाच वर्षानंतर अयोध्येला लागले. पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील आंबेडकर नगरात उपस्थितांना संबोधित केलं. मोदींनी अयोध्येत जय श्री रामचा नारा दिला, मात्र राम मंदिराबाबत एकही शब्द काढला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर, मोदी यंदा पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अयोध्येत दाखल झाले. मोदींच्या अयोध्यावारीमुळे राम मंदिर निर्माणाबाबत त्यांनी दिलेल्या वचनांच्या …

अयोध्येत मोदी म्हणाले जय श्री राम, पण राम मंदिराबाबत चकार शब्द नाही!

अयोध्या (उत्तर प्रदेश) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाय पाच वर्षानंतर अयोध्येला लागले. पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील आंबेडकर नगरात उपस्थितांना संबोधित केलं. मोदींनी अयोध्येत जय श्री रामचा नारा दिला, मात्र राम मंदिराबाबत एकही शब्द काढला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर, मोदी यंदा पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अयोध्येत दाखल झाले. मोदींच्या अयोध्यावारीमुळे राम मंदिर निर्माणाबाबत त्यांनी दिलेल्या वचनांच्या आठवणी ताज्या झाल्या. अगदी पक्षाच्या स्थापनेपासून राम मंदिर उभारण्याच्या मुद्द्याशिवाय भाजपचा जाहीरनामा पूर्णच होऊ शकलेला नाही. यंदाही हा मुद्दा भाजपच्या जाहीरनाम्यात आहेच. पण मोदी प्रचारात राम मंदिर निर्माणावर काय ठोस भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष होते, पण मोदींनी राम मंदिराबाबत भाष्य केलं नाही.

Picture

छेडणाऱ्याला सोडत नाही - मोदी

आम्ही नव्या हिंदुस्थानच्या मार्गावर आहोत, आम्ही कुणाला छेडत नाही, मात्र छेडणाऱ्याला सोडत नाही – मोदी

01/05/2019,12:24PM
Picture

नजर हटी, तो दुर्घटना घटी - मोदी

01/05/2019,12:20PM
Picture

आपल्या शेजारच्या देशात दहशतवाद्यांची आयात-निर्यात चालते – मोदी

01/05/2019,12:20PM
Picture

अयोध्येत येऊन धन्य झालो- मोदी

अयोध्यात येऊन मी स्वत:ला धन्य समजतोय. एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथे आले आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद.

01/05/2019,12:05PM
Picture

बसपाने बाबासाहेबांचं नाव वापरलं- मोदी

सपा बसपा आणि काँग्रेसची खरी ओळख व्हायची गरज. बसपानं बाबासाहेबांचं नाव वापरलं. बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांनी कष्टकऱ्यांची चिंता करायला हवी होती की नको, मोदींचा सवाल

01/05/2019,12:06PM
Picture

काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसने देशातील 40 कोटी पेक्षा जास्त कष्टकऱ्यांची कधीच काळजी केली नाही. काँग्रेस आणि इतरांनी फक्त आपापल्या लोकांचा फायदा करून घेतला. कोणताही चायवाला हा विचार नाही कर की त्याच्या मुलानं परत चहा विकावा. कष्टकऱ्यांनाही मोठं व्हायचं आहे. आमच्या सरकारने पहिल्यांदाच या लोकांचा विचार केला.

01/05/2019,12:06PM
Picture

सपा-बसपाचा बीपी वाढतोय- मोदी

या लोकांचं आयुष्य सुखी व्हावं यासाठी आम्ही अनेक योजना आणल्या. तुम्ही इतकं माझ्यावर प्रेम करत आहात, त्यामुळे सपा आणि बसपावाल्यांचा बी पी वाढतोय

01/05/2019,12:07PM

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *