Railway Track Blast: रेल्वे ट्रॅकवर स्फोट, दिवाळीपूर्वीच घातपाताचा डाव, भारत-पाक सीमेजवळ श्रीगंगानगरमध्ये घडलं काय?

Sri Ganganagar Railway Track Blast: राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अनूपगड-बठिंडा रेल्वे मार्गावर एक जोरदार स्फोट झाला. दिवाळीपूर्वी मोठा घातपात करण्याचा डाव समोर आला.

Railway Track Blast: रेल्वे ट्रॅकवर स्फोट, दिवाळीपूर्वीच घातपाताचा डाव, भारत-पाक सीमेजवळ श्रीगंगानगरमध्ये घडलं काय?
अनूपगड-बठिंडा रेल्वे मार्गावर एक जोरदार स्फोट
| Updated on: Nov 04, 2026 | 7:09 AM

Sri Ganganagar Railway Track Blast: राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील रेल्वे रुळावर स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनुपगड-बठिंडा रेल्वे मार्गावर एक जोरदार स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटात रेल्वे रुळाचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. दिवाळीपूर्वीच मोठा घातपात घडवण्याचा हा डाव असल्याचे समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

अनूपगड ते बठिंडा रेल्वे मार्गावर स्फोट

Loading...

ताज्या माहितीनुसार, राजस्थानमधील अनूपगड ते बठिंडा या रेल्वे मार्गावर स्फोटकं लावण्यात आली आणि स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट झाला त्यावेळी कोणतीही रेल्वे या मार्गावरून जात नव्हती. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. जीवितहानी टळली. या स्फोटामुळे रेल्वे रुळाचे नुकसान झाले आहे. या स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने यंत्रणांना याविषयीची माहिती दिली. स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. हा घातपाताचा प्रयत्न असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार स्फोट घडवण्याचा हा प्रयत्न होता. पण स्फोट लवकर झाला आणि संभाव्य धोका टळला. तर वेळेतच ही बाब समोर आल्याने पुढील दुर्घटनाही टळली. सुरक्षा यंत्रणा आता याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

स्फोटापूर्वीच धावली रेल्वे

भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागातील श्रीगंगानगर जिल्ह्यात हा स्फोट झाला. रामसिंहपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अनूपगड-सुरतगड या रेल्वे मार्गावर अज्ञातांनी रेल्वे ट्रॅक उडवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या रुळावरून नेमकीच एक रेल्वे धावली. त्यानंतर हा स्फोट झाला. रेल्वे उडवून देण्यासाठीच हा स्फोट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रेल्वे गेल्यानंतर जवळपास 45 मिनिटांनी हा स्फोट झाला. तर या स्फोटाने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटाचा आवाज 200 मीटरपर्यंत गेला. स्फोटानंतर या रेल्वे मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us