AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, अमिताभ झुनझुनवाला यांना अटक

Amitabh Jhunjhunwala : CBI ने रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. SBI च्या नेतृत्वाखालील बँकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, अमिताभ झुनझुनवाला यांना अटक
Amitabh Jhunjhunwala arrestedImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 10:37 PM
Share

सेंट्रल ब्युरो इन्वेस्टिगेशन म्हणजेच CBI ने रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. SBI च्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची 6,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. CBI च्या म्हणण्यानुसार, झुनझुनवाला त्या काळात रिलायन्स कम्युनिकेशन ग्रुपचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि फंड मॅनेजमेंट यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यावेळी ही फसवणूक झाली.

झुनझुनवाला यांच्यावर गंभीर आरोप

CBI ने म्हटले की, झुनझुनवाला यांनी कर्ज आणि अॅडव्हान्ससाठी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनांनुसार, बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा वापर किंवा व्यवस्थापन आरकॉम समूहातील इतर अधिकाऱ्यांनी केले. या कर्जाचा गैरवापर झाल्यामुळे बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप आहे. CBI ने पुढे सांगितले की, विविध बँकांकडून कर्ज मिळवून झुनझुनवाला यांची महत्त्वाची भूमिका होती.

आरकॉम कंपनीने कर्जाची परतफेड न केल्याने संबंधित खाती NPA झाली. या संदर्भात ते अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन समूहातील प्रवर्तकांकडून निर्देश घेत होते, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. स्टेट बँकेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून CBI ने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि अनिल अंबानी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली होती. या प्रकरणात SBI ला 2,929.05 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते.

17 बँकांना फटका

SBI च्या नेतृत्वाखालील 11 बँकांच्या कन्सोर्टियमने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडला टर्म लोन मंजूर केले होते. या सर्व बँकांना मिळून 6,015 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तक्रारीनुसार, 17 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे RCom कडे 19,694.33 कोटी रुपये थकले होते. CBI ने विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि LIC यांच्या तक्रारींवरून RCom, RHFL, RCFL आणि RTL विरोधात आणखी सहा एफआयआर नोंदवल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी होत आहे.

अमिताभ झुनझुनवाला हे ईडीकडून तपास सुरू असलेल्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते आणि दिल्लीतील तिहार कारागृहात बंद होते. सध्याच्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईतील विशेष न्यायाधीशांकडून प्रॉडक्शन वॉरंट मिळवण्यात आले. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले आणि 1 जून रोजी मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले.

16 आरोपींवरोधात आरोपपत्र दाखल

CBI ने न्यायालयात त्यांना औपचारिकरीत्या अटक केल्यानंतर ही नोंद कोर्टाने रेकॉर्डवर घेतली. त्यानंतर आरोपीला RCom प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून त्यांना आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीच्या मागणीवरील सुनावणी उद्या होणार आहे. दरम्यान, CBI ने 29 मे 2026 रोजी RCom प्रकरणात 16 आरोपींविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात कंपनी, RCom चे पाच वरिष्ठ अधिकारी आणि 10 बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच