AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Repo rate : होमलोनचा EMI कमी होणार का? 2 दिवसात निर्णय

Home loan : गृहकर्ज आणि इतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना इएमआय कमी होण्याची अपेक्षा आहे. कारण गेल्या २ वर्षात रेपो रेट वाढल्यानंतर इएमआय वाढला आहे. गेल्या एक वर्षापासून ते स्थिर ठेवण्यात आले असले तरी इएमआय कमी व्हावा अशी कर्ज घेतलेल्या ग्राहकांची अपेक्षा आहे.

Repo rate : होमलोनचा EMI कमी होणार का? 2 दिवसात निर्णय
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 06, 2024 | 9:41 PM
Share

RBI Repo Rate : सर्वजण कर्जाचा EMI कमी होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे यावेळी रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करेल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण रेपो रेटचा सरळ परिणाम ईएमआयवर होत असतो. आरबीआयची पतधोरण बैठक आजपासून सुरू झाली आहे. दोन दिवसात रेपो रेटवर निर्णय येऊ शकतो. पण यावेळी रेपो दर कमी होतील अशी आशा नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक मंगळवारी सुरू झाली आहे. किरकोळ महागाई विक्रमी पातळीवर राहिल्याने, अल्प मुदतीच्या कर्जाचे दर समान राहण्याची अपेक्षा आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये दर वाढले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अल्प मुदतीचे कर्ज दर म्हणजे रेपो रेट जवळपास वर्षभर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत. जागतिक घडामोडींमुळे चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी, फेब्रुवारी 2023 मध्ये व्याजदरात शेवटची वाढ करण्यात आली होती, तेव्हा ती 6.25 टक्क्यांवरून 6.5 टक्के करण्यात आली होती.

किरकोळ महागाई जुलै 2023 मध्ये 7.44 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती, परंतु तेव्हापासून ती घसरली आहे. किरकोळ चलनवाढ डिसेंबर 2023 मध्ये 5.69 टक्क्यांपर्यंत खाली आली.

८ फेब्रुवारीला निर्णय

RBI गव्हर्नर 8 फेब्रुवारी रोजी एमपीसीच्या बैठकीचा निर्णय जाहीर करतील. एमपीसीने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो रेटमध्ये एकूण 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती, परंतु तेव्हापासून ते स्थिर आहे. या समितीमध्ये तीन बाह्य सदस्य आणि तीन आरबीआय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जूनमध्ये कपात होऊ शकते

शशांक भिडे, आशिमा गोयल आणि जयंत आर वर्मा हे पॅनेलचे बाह्य सदस्य आहेत. गव्हर्नर दास यांच्याशिवाय डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा आणि कार्यकारी संचालक राजीव रंजन हे देखील त्याचे सदस्य आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आधीच आपल्या एका अहवालात म्हटले आहे की या पुनरावलोकनात RBI आपली धोरणात्मक भूमिका कायम ठेवू शकते. अहवालानुसार, पॉलिसी दर कपात केवळ जून-ऑगस्ट कालावधीत होण्याची शक्यता आहे.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, कारण... 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
अंत पाहू नका…अण्णा हजारेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारला थेट इशारा!.

अंत पाहू नका…अण्णा हजारेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकारला थेट इशारा!

सोनम वांगचुकसाठी उद्या रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; वेळेसह ठिकाणही ठरलं….

सोनम वांगचुकसाठी उद्या रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; वेळेसह ठिकाणही ठरलं…

अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला.

अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू; स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला

IND vs ENG: धावांचा पाठलाग करण्यात कोहलीच्या पुढे गेला जो रूट, पण हा भारतीय खेळाडू अजूनही सरस.

IND vs ENG: धावांचा पाठलाग करण्यात कोहलीच्या पुढे गेला जो रूट, पण हा भारतीय खेळाडू अजूनही सरस

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट; थेट मोठी घोषणा, आता मिळणार….

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट; थेट मोठी घोषणा, आता मिळणार…

भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र…?, संघ भूमीत उद्धव ठाकरे गरजले, सरसंघचालकांना दोन प्रश्न.

भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र…?, संघ भूमीत उद्धव ठाकरे गरजले, सरसंघचालकांना दोन प्रश्न