VIDEO: सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; पुस्तकात हिंदुत्वाची ISIS आणि बोको हरामशी तुलना केल्याचा वादावरून झाला हल्ला

| Updated on: Nov 15, 2021 | 6:49 PM

हल्लाचे फोटो शेअर करत, "हा हिंदू धर्म असू शकत नाही असे म्हणणे मी अजूनही चुकीचे आहे का?", खुर्शीद यांनी लिहीलं. हा हल्ला झाला तेव्हा माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते.

VIDEO: सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; पुस्तकात हिंदुत्वाची ISIS आणि बोको हरामशी तुलना केल्याचा वादावरून झाला हल्ला
Salman Khurshid Nainital house attacked
Follow us on

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर सोमवारी हल्ला झाला. त्यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ मध्ये हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हराम सारख्या कट्टरपंथी जिहादी गटांशी केल्यानंतर देशभरात वाद सुरू आहे. खुर्शीद यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ खुर्शीद यांनी प्रसिद्ध केला, ज्यात कथित हल्लेखोर तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करताना दिसत आहेत. हल्लाचे फोटो शेअर करत, “हा हिंदू धर्म असू शकत नाही असे म्हणणे मी अजूनही चुकीचे आहे का?”, खुर्शीद यांनी लिहीलं.

हा हल्ला झाला तेव्हा माजी केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. “माझ्या नैनिताल कॉटेजवर आज हल्ला झाला. सर्वजण सुरक्षित आहेत. आता नैनितालमधील माझ्या घराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत,” खुर्शीद म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सोमवारी सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावरील हल्ला ‘लज्जास्पद’ असल्याचे म्हटले आहे. “सलमान खुर्शीद हे एक राजकारणी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा गौरव केला आहे आणि देशाविषयी नेहमीच संयमी, मध्यवर्ती, सर्वसमावेशक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. आपल्या राजकारणात असहिष्णुतेची वाढती पातळी. सत्तेत असलेल्यांनी निषेध केला पाहिजे,” त्यांनी ट्विट केले.

हे ही वाचा

Covid Updates: चीनमधल्या झुआन्घे विद्यापीठ कॅम्पस लॉक, एकाएक 1,500 विद्यार्थी हॉटेलमध्ये स्थलांतरित

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

बंगळुरातल्या कृषी मेळाव्यात दांडग्या ‘कृष्णा’ची कमाल, 1 कोटींच्या बोलीने मालक मालामाल, देशी गोवंशाची किंमत डोकं चक्रावणारी!