Seema Haider: सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं! ते नाव ऐकताच पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, नामकरण सोहळ्याचा पाकपर्यंत डंका, नाव ठेवले काय?

Seema Haider Son Names: सीमा हैदर ही नेपाळमार्गे सचिन मीणा याच्या घरी आली. तिने लग्न केले. त्यानंतर तिला आता सहावं अपत्य झालं आहे. या मुलांचे थाटामाटात बारसं झालं. तिने मुलाचे जे नाव ठेवलं, त्यावरून आता पाकिस्तानमध्ये वादंग होत आहे. पाकिस्तानला या नावाने चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत.

Seema Haider: सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं! ते नाव ऐकताच पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, नामकरण सोहळ्याचा पाकपर्यंत डंका, नाव ठेवले काय?
सीमा हैदर, सचिन मीणा, मुलगा भारत
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 04, 2026 | 1:11 PM

Seema Haider Name Bharat to Child: पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई झाली. तिने मुलाचे नाव ‘भारत’ असे ठेवले. नोएडातील रबपूरा येथील घरी बारशाचा कार्यक्रम झाला. नामकरण सोहळ्यापूर्वी सीमाने घरी गोंधळ-जागरण कार्यक्रम आयोजित केला. हिंदू धर्मात जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्याचे नामकरण करण्यात येते. घरात जागरण घालण्यात येते. माझ्या घरात परंपरेनुसार या सर्व गोष्टी घडल्याने चांगले वाटत असल्याचे सीमा हैदर यावेळी म्हणाली.

नामकरण सोहळा धुमधडाक्यात

नामकरणाचा सोहळा धुमधडाक्यात पार पडला. भटजीकडून तिने बाळाचे नाव काढले. तेव्हा अद्याक्षर ‘भ’ आले. या नावावरून ‘भारत’ असे नाव ठेवल्याचे सीमा हैदरने सांगितले. गुरुवारी सीमा हैदरने तिच्या सहाव्या मुलाचे नाव ठेवले. तिने 18 फेब्रुवारी 2026 रोजी नोएडातील एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला. यापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. सीमा हिला तिच्या पाकिस्तानातील पतीकडून चार मुलं आहेत. तर सचिन मीणा याच्याकडून दोन मुलं आहेत.

नेपाळमार्गे आली पाकिस्तानातून आली भारतात

चार वर्षांपूर्वी सीमा हैदर ही पाकिस्तानातून पळाली. नेपाळमार्ग ती भारतात आली. तिने इथं आल्यावर सचिनसोबत लग्न केले. पण तिचे हे बिंग फुटले. त्यानंतर तिची अनेक दिवस मीडिया ट्रायल झाली. पाकिस्तानातूनही तिच्यावर चौफेर टीका झाली. तिच्या नवऱ्याने तिला परत पाठवण्याची विनंती केली. पाकिस्तानमध्ये सीमा हैदर आणि तिचा पती गुलाम हैदर यांचा विवाह 2014 मध्ये झाला होता. 2019 मध्ये गुलाम हैदर हा सीमा आणि चार मुलांना कराचीत सोडून दुबई येथे गेला. त्याचवर्षी सीमा आणि सचिन मीणा यांची पबजी खेळताना ऑनलाईन संपर्क झाला पुढे प्रेम झाले.

10 मार्च 2023 रोजी नेपाळमध्ये सीमा आणि सचिन यांच्यात पहिली भेट झाली. तिथे तिने एका मंदिरात धर्म परिवर्तन केले. तिथेच दोघांनी लग्न केले. त्यानंतर सीमा पाकिस्तानात परतली. तर सचिन मीणा नोएडा परतला. त्यानंतर 21 जुलै 2023 रोजी सीमा हिने भारतीय नागरिकत्वासाठी राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली होती. हा मुद्दा दोन्ही देशात चांगलाच गाजला होता. पण सीमा पाकिस्तानात परत गेली नाही. आता सीमा आणि सचिन यांच्या संसारवेलीवर दोन फुलं फुलली आहेत. तर नवीन मुलाच्या नावावरून पाकिस्तानमध्ये मोठी चर्चा आहे.

Follow Us