Shraddha murder Case: आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढचा मुक्काम तिहार जेलमध्ये

| Updated on: Nov 26, 2022 | 5:42 PM

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचा पुढचा मुक्काम तिहार जेलमध्ये असणार आहे.

Shraddha murder Case: आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढचा मुक्काम तिहार जेलमध्ये
आफताब पुनावाला
Image Credit source: Social Media
Follow us on

नवी दिल्ली,  श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरणातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावाला (Aftab Punawala) याला न्यायालयाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी आफताबला आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातच कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. इथेच आफताबची पेशी झाली. विशेष सीपी कायदा आणि सुव्यवस्था सागरप्रीत हुड्डा म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी मॅजिस्ट्रेटला आंबेडकर हॉस्पिटलमध्येच न्यायालय स्थापन करण्याची विनंती केली होती.

नार्को चाचणीपूर्वी दिल्ली पोलिसांचे पथक आफताबला आंबेडकर रुग्णालयात प्रक्रियेसाठी घेऊन गेले होते. दरम्यान, तो शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायालयात हजर झाला आणि सुनावणीनंतर न्यायालयाने आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता आफताबचा पुढचा मुक्काम तिहार तुरुंग असेल.

प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी अजूनही काही गोष्टींचा उलगडा  होणे बाकी आहे. आरोपी आफताबने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असली तरी, असे अनेक प्रश्न पोलिसांसाठी पेचप्रसंग बनून उभे आहेत. दिल्ली पोलिसांना अद्याप असे पुरावे मिळालेले नाहीत ज्यावरून ते न्यायालयात आफताबला दोषी सिद्ध करू शकतील.

हे सुद्धा वाचा

श्रद्धाची हत्या दिल्लीत झाली असली तरी संपूर्ण कट हिमाचलमध्ये रचला गेल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची उकल करण्यासाठी दिल्ली पोलिस पाच राज्यांमध्ये तपास करत आहेत. मुंबईतील श्रद्धा आणि आफताबच्या जवळच्या मित्रांचीही पोलीस चौकशी करत आहेत. इकडे गुरुग्राममध्येही पोलिसांनी श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांचा अनेकदा शोध घेतला आहे.

पोलिस अजूनही पुरावे शोधत आहेत

विशेष म्हणजे या प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने श्रद्धाची हत्या केली आणि मृतदेहाचे 35 तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. आफताबने नमूद केलेल्या ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम राबवली, मात्र अजूनही ठोस पुरावे शोधले जात आहेत.