रमजान पवित्र, दहशतवाद विरोधी मोहीम थांबवा : मुफ्ती

श्रीनगर : रमजान दरम्यान काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी कारवाया थांबवा, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्तींनी केली. शनिवारी पत्रकार परिषद घेत मुफ्तींनी ही मागणी केंद्र सरकार आणि सुरक्षा दलाकडे केली. रमजान दरम्यान काश्मीरच्या लोकांना शांती मिळावी आणि पवित्र रमजान महिन्यात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले आणि सर्च ऑपरेशनसारख्या हिसंक कारवाया …

रमजान पवित्र, दहशतवाद विरोधी मोहीम थांबवा : मुफ्ती

श्रीनगर : रमजान दरम्यान काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी कारवाया थांबवा, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्तींनी केली. शनिवारी पत्रकार परिषद घेत मुफ्तींनी ही मागणी केंद्र सरकार आणि सुरक्षा दलाकडे केली.

रमजान दरम्यान काश्मीरच्या लोकांना शांती मिळावी आणि पवित्र रमजान महिन्यात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले आणि सर्च ऑपरेशनसारख्या हिसंक कारवाया केल्या जाऊ नये, यासाठी मुफ्तींनी पत्रकार परिषद घेत आपली मागणी सरकारसमोर मांडली. याशिवाय मेहबूबा यांनी दहशतवाद्यांनाही रमजान दरम्यान सुरक्षा दलावर कोणताही हल्ला करु नये, असं आवाहन केलं आहे.

“रमजानचा महिना लवकरच सुरु होत आहे. या संपूर्ण महिन्यात लोक नमाज पडतात आणि मशिदीत जातात. अशावेळी काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया थांबवाव्यात,गेल्यावर्षी मी मुख्यमंत्री असताना काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा थांबवण्यात आल्या होत्या”, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

दहशतवाद्यांना मेहबूबा मुफ्तींचे आवाहन

रमजान दरम्यान मुफ्तींनी सुरक्षा दलाशिवाय दहशतवाद्यांनाही हल्ले न करण्याचे आवाहन केले आहे. रमजानचा महिना हा पवित्र महिना असतो. यामुळे या महिन्यात कोणता दहशतवादी हल्ला करु नका, असही मुफ्तींनी यावेळी सांगितले.

मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री असताना गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये रमजान महिन्यात दहशतवाद विरोधी मोहिम थांबवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये ही मोहिम थांबवल्यानंतरही दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ले करण्यात आले होते. तसेच दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिकांनाही त्यावेळी निशाणा बनवले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *