AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : अभिनेत्रीपेक्षा ही सुंदर, कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी

UPSC Success Story : IPS अंशिका वर्मा हिला UPSC नागरी सेवा परीक्षेत 972 गुण मिळाले आहेत. यूपीएससीच्या तयारीसाठी तिने कधीही कोचिंग घेतले नाही. यूपी केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.

Success Story : अभिनेत्रीपेक्षा ही सुंदर, कोणत्याही क्लासेस शिवाय बनली IPS अधिकारी
| Updated on: Sep 28, 2023 | 2:06 PM
Share

IPS Success Story : दरवर्षी हजारो तरुण यूपीएससी परीक्षा देतात. पण त्यापैकी मोजक्याच जणांना यश मिळतं. या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक जण कोचिंग क्लासेसची मदत घेतात. तर काही जण आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होतात. आयपीएस अंशिका वर्मा देखील त्यापैकीच एक नाव. जिने कोणत्याही शिकवणी शिवाय ही परीक्षा उत्तीर्ण झाली.

इंजिनीअरिंगनंतर यूपीएससीची तयारी

अंशिका वर्मा ही प्रयागराजची राहणारी.  गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. नागरी सेवेत रुजू होण्याचे तिचे सुरुवातीपासूनचे स्वप्न होते.

पहिल्या प्रयत्नात अपयश

इंजिनीअरिंग केल्यानंतर तिने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. यूपीएससीसाठी तिने  कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. 2020 मध्ये तिने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. अपयशानंतरही तिने हिंमत हारली नाही आणि अभ्यास सुरूच ठेवला.

देशात 136 वा क्रमांक

2021 मध्ये तिने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यावेळी तिला देशात 136 वा क्रमांक मिळाला आहे. तिला यूपीएससीमध्ये एकूण 972 गुण मिळाले. लेखी परीक्षेत 796 तर मुलाखतीत 176 गुण मिळाले होते.

अंशिका वर्माची IPS साठी निवड

UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर अंशिका वर्माची IPS साठी निवड झाली. आयपीएसमध्ये निवडीसोबतच तिला होम केडरही मिळाले. अंशिका सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा आहे. तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.