CM Vijay : कधीकाळचा रजनीकांत यांच्या घरातला माणूस मुख्यमंत्री विजय यांच्यासमोर चॅलेंज निर्माण करणार, आज त्याने पहिलं पाऊल टाकलं

CM Vijay : तामिळनाडूत सध्याच्याघडीला मुख्यमंत्री विजय यांना आव्हान देणारा कुठला चेहरा दिसत नाहीय. पण लवकरच चित्र बदलू शकतं. विजय यांना दक्षिणेतल्याच बड्या स्टारकडून राजकारणात आव्हान मिळू शकतं.

CM Vijay : कधीकाळचा रजनीकांत यांच्या घरातला माणूस मुख्यमंत्री विजय यांच्यासमोर चॅलेंज निर्माण करणार, आज त्याने पहिलं पाऊल टाकलं
Rajnikanth-Vijay
| Updated on: Oct 25, 2026 | 4:04 PM

तामिळनाडूच्या राजकारणाची पुन्हा एकदा देशात चर्चा सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला. कारण अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाने थेट राज्याची सत्ता मिळवली. आजच्या घडीला तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय लोकप्रिय चेहरा आहे. पण आता विजय यांच्या लोकप्रियतेला तामिळनाडूतील दुसऱ्या सुपरस्टारकडून आव्हान मिळू शकतं. विजय यांनी आधी फॅन क्लब स्थापन केला. त्या फॅन क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करुन ओळख बनवली. मग ते राजकारणाकडे वळले. आता तामिळ सुपरस्टार धनुषने सुद्धा विजय यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.

‘धनुष नर्पणि इयक्कम’ हा धनुष यांचा फॅन क्लब आहे. आज चेन्नईच्या ओएमआर येथे या फॅन क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. राजकीय विश्लेषकांनुसार धनुष यांचा ‘धनुष नर्पणि इयक्कम’ फॅन क्लब थेट विजय यांच्या TVK च्या युवा आणि महिला मतदारांना टक्कर देऊ शकतो. चेन्नईतल्या एका खासगी कॉलेजमध्ये आज 25 ऑक्टोंबरला धनुष यांच्या ‘नर्पणि इयक्कम’ महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. तामिळनाडूच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 3 हजार ते 5 हजार महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. धनुष यांचं सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत सुद्धा खास नातं आहे. धनुषने रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांतसोबत लग्न केलेल. पण दोघे आता विभक्त झाले आहेत.

Loading...

या तीन घटना एन्ट्री करण्याचे संकेत

धनुषने अजून राजकारणात पाऊल ठेवण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण त्यांनी फॅन क्लबचं नाव बदलून ‘इयक्कम’ केलं आहे. दिल्ली दौरा आता महिला पदाधिकाऱ्यांची बैठक या तीन घटना धनुष राजकारणात एन्ट्री करण्याचे संकेत देत आहेत. ही बैठक फक्त फॅन मीट नाहीय. रिपोर्ट्सनुसार, धनुष महिला पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्यांच्यासोबत वेगवेगळे फोटो काढणार आहेत. त्यांना भेटवस्तू दिल्या जातील. तळागाळात संघटना मजबूत करण्याचं पाऊल म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

स्थानिक पातळीवर एक नेटवर्क तयार होईल

तामिळनाडूच्या राजकारणात महिला मतं महत्वाची मानली जातात. म्हणून महिला पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक एक रणनितीक पाऊल मानलं जात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर एक नेटवर्क तयार करता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us