Abhijeet Dipke : अभिजीत दीपके यांना झटका, मोठ्या नेत्याने समर्थन मागे घेतलं, CJP पासून झाला लांब
Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना धक्का बसला आहे. नुकताच त्यांच्या भूमिकेला, आंदोलनाला देशातील बड्या नेत्याचं समर्थन मिळालं होतं. पण आता या नेत्याने भूमिका बदलली आहे.

भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले अन्नामलाई यांनी आधी कॉकरोच जनता पार्टीच समर्थन केलं होतं. पण आता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. सीजेपीचं समर्थन करत नाही असं म्हटलं आहे. अन्नामलाई हे तामिळनाडू दक्षिणेतील मोठे नेते आहेत. भाजपचा ते तामिळनाडूतील प्रमुख चेहरा होते. अलीकडेच अन्नामलाई म्हणालेले की, “सीजेपीकडून जे प्रश्न विचारले जातायत, त्याचं मी समर्थन करतो” अन्नामलाई यांनी जून महिन्यात भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. ते भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष होते. माजी IPS राहिललेले अन्नामलाई भाजपचे तामिळनाडूतील पोस्टर बॉय बनले होते. मिडिया रिपोर्टनुसार गुरुवारी अन्नामलाई म्हणाले की, “आम्ही कधीच कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन केलं नाही. त्यांचा अजेंडा वेगळा आहे, आमचा अजेंडा वेगळा आहे”
याआधी अन्नामलाई काय बोलले होते, ते समजून घ्या. “त्यांच्या विरोध प्रदर्शनाच्या पद्धतीशी मी भले सहमत नसीन. पण त्यांना जे प्रश्न विचारायचेत त्या बाबतीत मी सीजेपीचं पूर्णपणे समर्थन करतो. अटक करुन तुरुंगात टाकल्यामुळे सीजेपीचे नेते अजून बळकट होतील. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना SIR मुद्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे” असं अन्नामलाई म्हणाले.
प्रत्येकवेळी ते एक शत्रू निर्माण करतात
एकामाजी आयपीएस अधिकाऱ्याने पोस्ट केलेली. त्यात त्याने म्हटलेलं की, “केंद्र सरकार हे विसरुन जाते की, मागच्या 12 वर्षांपासून ते सत्तेत आहेत. स्वत:च महत्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी ते एक शत्रू निर्माण करतात” सीजेपीच्या प्रदर्शनाला देशविरोधी आणि परदेशी फंडिंगवर संचालित होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.
म्हणून त्यांनी भाजपमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला
सतत होत असलेल्या टिप्पणीवरुन भाजपनेही पलटवार केला आहे. तामिळनाडू भाजपचे प्रवक्ते नारायणन तिरुपती म्हणाले की, “भाजपमध्ये असताना अन्नामलाई SIR चं समर्थन करत होते. त्यांनी हे काम सुद्धा पाहिलं आहे. आता त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्यासोबतच्या डिबेट मध्ये अन्नामलाई यांनी SIR चा बचाव सुद्धा केला होता” भाजपची राष्ट्रीय पक्षाची इमेज असल्याने तामिळनाडूच्या राजकारणात मर्यादा येत असल्याचं अन्नामलाई यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी भाजपमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. आता ते स्वतंत्र पक्ष बनवण्याच्या तयारीत आहेत.