AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण स्फोटाने तामिळनाडू हादरलं! 16 जणांचा होरपळून मृत्यू, कारखान्यात खळबळ

Firecracker Factory Blast : विरुधुनगर जिल्ह्यात असलेल्या एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

भीषण स्फोटाने तामिळनाडू हादरलं! 16 जणांचा होरपळून मृत्यू, कारखान्यात खळबळ
factory blastImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 19, 2026 | 6:19 PM
Share

तामिळनाडूतून संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. विरुधुनगर जिल्ह्यात असलेल्या एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फटाका कारखान्यात स्पोट

समोर आलेल्या माहितीनुसार, हा भीषण स्फोट कट्टनारपट्टी परिसरातील एका क्रॅकर युनिटमध्ये झाला, त्यानंतर आजूबाजूच्या चार युनिट्सना आग लागली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींनाही नुकसान झाले. या स्पोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके दाखल झालू असून ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. प्रशासनाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

बचावकार्य सुरू

फटाका कारखान्यात झालेल्या या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार फटाके तयार करताना सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे हा अपघात झाला असावा. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मते, बचावकार्य वेगाने सुरू असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश

या दुर्घटनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ‘विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनापट्टी येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत.’ मुख्यमंत्र्यांनी मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन आणि थंगम थेन्नारासु यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य वेगाने करण्याचे, त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्टालिन यांनी दिल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...