“26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही”

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत […]

26/11 चा बदला घेण्यासाठीही वायूसेना सज्ज होती, पण सरकारने परवानगी दिली नाही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 12 विमानांमधून एक हजार किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. पण यानिमित्ताने एक जुना किस्सा समोर आलाय. मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतरही वायूसेनेकडून अशाच प्रकारची कारवाई केली जाणार होती. पण त्याला सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्याची खंत माजी अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. शेकडो निरापराध लोकांचा बळी या हल्ल्यात गेला. तेव्हाही भारतीयांमध्ये संतापाची लाट होती. वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बदला घेण्याची तयारी केली होती. पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार होती. त्यावेळचे विंग कमांडर मोहंतो पँगिंग मिराज 2000 आणि सुखोई एसयू-30 लढाऊ विमानांच्या ताफ्यासह पीओकेमधील मुजफ्फराबादमध्ये जाऊन एअर स्ट्राईकचं नेतृत्त्व करण्यासाठी तयार होते.

मोहंतो पँगिंग यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिलाय. ते म्हणतात, 26/11 हल्ल्यानंतर आम्हीही मुजफ्फराबादमध्ये घुसून अशाच प्रकारच्या एअर स्ट्राईकची योजना आखली होती. मी सुखोई स्क्वॉड्रनचं नेतृत्त्व करत होतो. आम्ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आणि मुलांना खोटं सांगितलं की आपण दुसरीकडे जातोय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणतात, “ही योजना कधीही प्रत्यक्षात उतरली नाही. आम्ही कामाला लागलो होतो आणि जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त वाट पाहिली. पण तेव्हाच्या सरकारने परवानगी दिली नाही. पण मी आज खुश आहे की आपण एअर स्ट्राईक केली.” 26/11 हल्ला झाला तेव्हा केंद्राय काँग्रेसप्रणित यूपीए-1 सरकार होतं. तर मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते.

पाकिस्तानवर अखेर कारवाई केल्याचा आनंद या माजी अधिकाऱ्याने व्यक्त केलाय. अखेर पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प वायूसेनेच्या मिराज 2000 ने उद्ध्वस्त केले. आम्हीही 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर अशीच तयारी केली होती. मुजफ्फराबादमधील दहशतवाद्यांचे तळ उडवणार होतो, पण सरकारने निर्णय घेतला नाही. देर आए दुरुस्त आए.. चीअर्स!, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.