AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : भाडे न भरणे हा गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंना मोठा दिलासा

डेकरूने जर काही अडचणींमुळे भाडे भरले नाही तर तो गुन्हा ठरणार नाही. तसेच याप्रकरणी भादंवि कलमांतर्गत कोणतीही शिक्षा नाही, असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले. हा निकाल नीतू सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांच्या याचिकेशी संबंधित आहे.

Supreme Court : भाडे न भरणे हा गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाचा भाडेकरुंना मोठा दिलासा
‘लिव्ह-इन’मध्ये जन्मलेल्या मुलाचा पित्याच्या संपत्तीवर हक्कImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 15, 2022 | 7:00 PM
Share

नवी दिल्ली : भाडे (Rent) न भरणे हा भारतीय दंड संहितेअंतर्गत दंडनीय गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने एका प्रकरणात दिला आहे. संबंधित प्रकरणात घरमालकाने भाडेकरूविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तो एफआयआर रद्द करीत न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालाने भाड्याने राहणार्‍या अनेक कुटुंबांना मोठा दिलासा (Relief) मिळाला आहे. या प्रकरणात भादंवि कलम 415 अन्वये फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासाठी आणि कलम 403 अंतर्गत गैरवापर केल्याच्या गुन्ह्यासाठी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्या निकालाविरोधात दाखल झालेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. (The Supreme Court has given a big relief to the non-paying tenants)

भाडे न भरले म्हणून शिक्षा ठोठावण्याची कुठलीही तरतूद नाही

न्यायालय म्हणाले की, भाडेकरूने जर काही अडचणींमुळे भाडे भरले नाही तर तो गुन्हा ठरणार नाही. तसेच याप्रकरणी भादंवि कलमांतर्गत कोणतीही शिक्षा नाही, असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले. हा निकाल नीतू सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांच्या याचिकेशी संबंधित आहे. या खटल्याची न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या कारणास्तव एफआयआर रद्द

यासंबंधित तक्रारीत दिलेले तथ्य खरे असले तरी हा गुन्हा नाही असे आमचे मत आहे. भाडे न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, परंतु आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार नाही. कलम 415 (फसवणूक) आणि कलम 403 (मालमत्तेचा गैरवापर) अंतर्गत आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे आणि ठोस पुरावे नाहीत. तसेच तशी परिस्थितीही नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित एफआयआर रद्द केला आहे. यापूर्वी हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर उच्च न्यायालयाने अपीलकर्त्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतरच त्याने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

भाडे वसूल करण्याचा मार्ग खुला

भाडेकरूंची मोठी थकबाकी आहे, याकडे लक्ष वेधत अपिलकर्त्याने आपल्या समस्यांचा पाढा न्यायालयासमोर वाचला. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने निकाल दिला. जर भाडेकरूने मालमत्ता रिकामी केली असेल, तर हे प्रकरण दिवाणी उपायांतर्गत निकाली काढता येईल. न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले. (The Supreme Court has given a big relief to the non-paying tenants)

इतर बातम्या

Sangli Crime : सांगलीत वाळू तस्करांची मुजोरी, चक्क महिला तहसिलदार यांच्या गाडीवरच घातली गाडी

Manoj Katke : डोंबिवलीतील मनोज कटके हल्ला प्रकरण, भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...