ही आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे सापाचा सर्वात मोठा शत्रू, एकदा घरात लावली की निश्चिंत व्हायचं, साप पुन्हा दिसणारच नाही

साप नुसता पाहिला तरी आपल्याला भीती वाटते. साप घरात घुसू नये यासाठी आपण विविध उपाय करत असतो. आज आपण अशाच एका रामबाण उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात कधीच साप दिसणार नाही.

ही आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे सापाचा सर्वात मोठा शत्रू, एकदा घरात लावली की निश्चिंत व्हायचं, साप पुन्हा दिसणारच नाही
snakes
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 6:34 PM

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळाबाहेर निघण्याचं प्रमाण वाढतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापते. गरम वाफा बिळात जातात. निसर्गाने सापाची रचनाच अशी केलेली असते की साप हा थंड रक्ताचा प्राणी असतो, त्याला उष्णता अजिबात सहन होत नाही. जमीन तापल्यामुळे सापं बिळाच्या बाहेर पडतात आणि थंड जागेचा शोध घेतात. अनेकदा अशी देखील शक्यता असते की, आपल्या घरात कुठेतरी अडचण असते, सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा सापडते तसेच घरात थंड वातावरण असल्यामुळे साप तिथे आश्रय घेतात. अशावेळी संर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वाढ होते. त्यामुळे अशावेळी काळजी घेणं गरजेचं असतं.

तर अनेकदा असं देखील होतं, ती तुम्हाला जर बाग कामाची आवड असेल, तुम्ही जर तुमच्या घराच्या परिसरात झाडं लावली असतील तर अशा झाडांचा आश्रय देखील साप घेऊ शकतात. विशेष: बांबूचं झाड, चंदनाचं झाडं, किंवा ज्या झाडामुळे अडचण निर्माण होऊ शकते. सापांना लपण्यासाठी जागा मिळते अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या बागेत देखील साप आढळून येऊ शकतात. त्यामुळे साप घरात येऊ नयेत, यासाठी काही खास उपाय केले जातात.

भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील मोजक्याच जाती या विषारी आहेत. त्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग या चार प्रमुख जातींचा समावेश आहे. या चार जाती महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी. साप कोणताही असेल तरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये, त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्यावी.

आता पाहुयात असं कोणतं झाडं आहे. ती जे जर तुम्ही घरात लावलं तर त्यामुळे घरात साप येत नाहीत. हे झाडं दुसरं, तिसरं कोणतंही नसून हे झाडं  आहे, सब्जाजाचं. सब्जा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आयुर्वेदात तिचे अनेक उपयोग आहेत. मात्र याही पलीकडे तिचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे ज्या घरात किंवा परिसरात ही वनस्पती असते, त्या घरात चुकूनही साप येत नाही.

Follow Us