AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu Kashmir: ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे नोंदवला निषेध

दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील रामबाग भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी ही माहिती दिली. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक, टीआरएफ कमांडर मेहरान यासीन होता.

Jammu Kashmir: ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे नोंदवला निषेध
India's Anti-terrorism action in Jammu Kashmir
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 25, 2021 | 6:00 AM
Share

नवी दिल्लीः सीमेवर ड्रोन पाठवून आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल बीएसएफच्या (Border Security Force) शिष्टमंडळाने बुधवारी पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदविला आणि अशा कारवायांपासून दूर राहण्यास सांगितले. बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जकात चौकीवर पाकिस्तानी रेंजर्ससोबत कमांडंट स्तरावरील बैठकीदरम्यान हा निषेध नोंदवण्यात आला. बैठकीदरम्यान, दोन्ही सीमा सुरक्षा दलांच्या कमांडर्सनी सीमेवरील खांबांची देखभाल आणि सीमेवरील पायाभूत सुविधा, पाकिस्तानकडून ड्रोन ऑपरेशन्स आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली. सीमेवर शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पावलं उचलण्यासाठी दोन्ही कमांडर सहमत असल्याचं प्रवक्त्यांनी सांगितले. बीएसएफच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कमांडंट अजय सूर्यवंशी आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व 13 विंग चिनाब रेंजर्सचे विंग कमांडर लेफ्टनंट कर्नल अकील यांनी केले.

चकमकीत तीन दहशतवादी ठार

दरम्यान, जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील रामबाग भागात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील लाल चौक-विमानतळ मार्गावरील रामबाग पुलाजवळ झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. कमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक, टीआरएफ कमांडर मेहरान यासीन हा श्रीनगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांच्या हत्येत सामील होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख- TRF कमांडर मेहरान यासीन शल्ला, मंजूर अहमद मीर आणि अराफत अहमद शेख, अशी आहे. ही माहिती काश्मीर पोलीसांनी दिली.

दोन दिवस आधी, राष्ट्रीय तपास संस्थेने टेरर फंडिंग प्रकरणी श्रीनगरमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या कार्यालयांसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएने आपल्या विधानांमध्ये वारंवार दावा केला आहे की वेगवेगळ्या संस्थांना अज्ञात देणगीदारांकडून निधी मिळत होता, ज्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी नवीन योजना तयार केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळत आहे. या अंतर्गत पाकिस्तान पाण्यातून दहशतवाद्यांना पाठवू शकतो आणि त्यावर त्यांनी काम सुरू केले आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. पाकिस्तान त्यांच्या स्पेशल फोर्ससाठी अनेक परदेशी कंपन्यांकडून पाण्याखाली चालणाऱ्या लहान क्राफ्ट खरेदी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या

AK-203 असॉल्ट रायफलसाठी सरकारचा 5000 कोटींचा करार, जाणून घ्या काय आहे खास?

ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार, राजकीय चर्चांना उधाण

International Flights: अखेर दोन वर्षांनंतर भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सामान्य होणार

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...