Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे बुरे दिन, अजून एक जवळचा माणूस दूर जाण्याच्या तयारीत

Mamata Banerjee : नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे बुरे दिन, अजून एक जवळचा माणूस दूर जाण्याच्या तयारीत
Mamata Banerjee
| Updated on: May 25, 2026 | 3:40 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पश्चिम बंगालमधील अन्याय आणि भ्रष्टाचारामुळे लोकांच्या वाढणाऱ्या चिंताचा हवाला देत ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस बारासात ऑर्गनायजेशनल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पदाचा राजीनामा दिला आहे. काकोली घोष या ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय खासदार म्हणून ओळखल्या जायच्या. “राज्यातील अलीकडच्या काही घटनांनी लोकांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. पक्ष नेतृत्व याकडे डोळेझाक करु शकत नाही” असं चारवेळच्या तृणमुल खासदार काकोली घोषण यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

त्यांनी राजकारणात पारदर्शकता, जबाबदारी, शिस्त आणि कटिबद्धता यावर जोर देत म्हटलं की, अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पक्षाचं खराब प्रदर्शन जनतेचा मूड दाखवून देतं. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काकोली यांनी जिल्हाध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. काकोली घोष दस्तीदार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांनी पक्ष नेतृत्वाला अनुभवी आणि समर्पित कार्यकर्त्यांना महत्व देण्याचा आग्रह केला. एक मजबूत संघटनात्मक रचना पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी, तळागाळातील समर्थकांना पुन्हा जोडण्यासाठी उपयोगाची ठरेल.

आज मला माझ्या चार दशकाच्या प्रामाणिकपणाचं इनाम मिळालं

काकोली घोष दस्तीदार यांना आधीच लोकसभेच्या चीफ विजिलेंस ऑफिसर पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी फेसबुक वर पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली. आज मला माझ्या चार दशकाच्या प्रामाणिकपणाचं इनाम मिळालं आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. काकोली यांच्या घरासमोर सेंट्रल फोर्सची सिक्योरिटी वाढवली जाऊ शकते. काकोली यांनी रविवार एक पत्रकार परिषद घेतली. नॉर्थ 24 परगणाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

पक्ष सांगेल त्यावेळी आम्ही बोलू

काकोली यांच्या राजीनाम्यावर तृणमुल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांनी हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे किंवा नाही यावर कोणी कमेंट करणार नाही. पक्ष सांगेल त्यावेळी आम्ही बोलू. एक सक्रीय राजकारणी असण्याबरोबर काकोली घोष एक गायनाकोलॉजिस्ट सुद्धा आहेत. त्यांनी आरजी कर मेडिकल कॉलेज, हॉस्पिटलमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यानंतर लंडनच्या ऑब्सटेट्रिक अल्ट्रासाउंडमध्ये ट्रेनिंग घेतली. हेल्थकेयर आणि महिलांचे मुद्दे उचलणं ही त्यांची खासियत आहे. त्या तृणमूल महिला काँग्रेसच्या नॅशनल प्रेसिडेंट आणि लोकसभेत पक्षाच्या व्हिप सुद्धा होत्या.

Follow Us