
अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला आहे. शनिवारी इस्रायलने आधी इराणवर हल्ला केला, त्यानंतर या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली आणि जगात भीषण युद्धाला सुरुवात झाली. आज या युद्धाचा तिसरा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलेलं असतानाच आता हादरवणारी माहिती समोर आली आहे. हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. इराणकडून फार मोठा धोका असल्याचं कारण पुढे करत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला. मात्र आता अमेरिकेच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक पार पडली आहे. या बैठकीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये हे मान्य केलं आहे की, अशी कोणतीही गुप्त माहिती नव्हती की ज्यामधून असे संकेत मिळू शकतील की इराणकडून धोका आहे, किंवा इराण अमेरिकन सैन्य तळांवर हल्ला करणार आहे. मात्र असं असताना देखील ट्रम्प यांनी इरणावर हल्ल्याचे आदेश दिले.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत इराणमधील तब्बल 1 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले करण्यात आले आहेत. मात्र रविवारी पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठर पार पडली, या बैठकीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी इराणवर हल्ला कराण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना असं वाटलं की इराण अमेरिकन सैन्यदलावर हल्ला करू शकतो. इराणकडून धोका आहे, त्यामुळे इराणवर हल्ला करण्यात आला.
दरम्यान या बैठकीमध्ये संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्त अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की, इराणच्या बॅलिस्टिक मिसाई आणि वाढवलेलं सैन्यबळ हे अमेरिकेसाठी धोका होतं, मात्र इराण अमेरिकेवर पहिला हल्ला करणार आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. दरम्यान या युद्धामुळे आता मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला आहे.