AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Crime : बिहारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार, पीडितेला रस्त्यावर फेकून आरोपींचे पलायन

पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेडिकलमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. याबाबत पीडितेकडे चौकशी केली असता दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सध्या पाडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडिता आपल्या मित्राला भेटण्यासाठी आपल्या घरुन सकड्डी येथे आली होती.

Bihar Crime : बिहारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार, पीडितेला रस्त्यावर फेकून आरोपींचे पलायन
नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 4:22 PM
Share

बिहार : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार (Abuses) करुन रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कोइलवार पोलीस (Koilvar Police) ठाण्याच्या हद्दीतील साकडी मोर येथे ही घडली आहे. घटनेनंतर आरोपींनी तेथून पळ काढला. स्थानिकांनी मुलीला पाहिल्यानंतर याची माहिती कोइलवार पोलिसात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारादरम्यान मुलीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Two youths abuses a girl in Bihar under the pretext of giving her a lift)

पीडितेची प्रकृती गंभीर

पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेडिकलमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. याबाबत पीडितेकडे चौकशी केली असता दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सध्या पाडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडिता आपल्या मित्राला भेटण्यासाठी आपल्या घरुन सकड्डी येथे आली होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोघांनी तरुणीला लिफ्ट दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेले. पीडित तरुणी चारपोखरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पुण्यात नात्याला काळिमा, चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चाकण शहरातील उच्चभ्रु सोसायटीत घडली आहे. सख्ख्या चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन काळात शाळांना सुट्टी असताना राहत्या घरात चुलत बहिणीसोबत आश्लिल वर्तन करुन अत्याचार केल्याची घटना घडली. या दरम्यान भिती पोटी मुलीने हा सर्व प्रकार कुटुंबियांना न सांगता शाळेतील शिक्षिकेला सांगितला. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने नराधम पुतण्याच्या विरोधात चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन चाकण पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम मुलगा फरार आहे. चाकण पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. (Two youths abuses a girl in Bihar under the pretext of giving her a lift)

इतर बातम्या

Medha Patkar : पोलीस तक्रार प्राधिकरण सक्षम करा; मेधा पाटकर यांची हायकोर्टात धाव

Pune Murder | माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.