इराणचा भारताला मोठा धक्का; पहिल्यांदाच असं घडलं, मध्य पूर्वेतून खळबळ उडवणारी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये अजूनही मोठा तणाव पहायला मिळत आहे. याचा आता मोठा फटका भारताला बसला आहे. मध्य पूर्वेतून आलेल्या बातमीमुळे टेन्शन वाढलं आहे.

इराणचा भारताला मोठा धक्का; पहिल्यांदाच असं घडलं, मध्य पूर्वेतून खळबळ उडवणारी बातमी
pezeshkian
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 18, 2026 | 6:14 PM

इराणने शुक्रवारी मोठी घोषणा केली होती. आम्ही जगासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन करत असल्याचं इराणने म्हटलं होतं. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करताच भारतासह जगाला मोठा दिलासा मिळाला होता. कारण संपूर्ण जगाला जेवढी कच्च तेल आणि एलपीजी गॅसची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के वाहतूक या मार्गाने होते. इराणने घोषणा करताच कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी इराणकडून स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा केली, मात्र अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये सामान्य परिस्थिती नसल्याचं दिसून येत आहे.

याचा मोठा फटका हा भारताला बसला आहे. शिपिंग ट्रॅकिंग डेटानुसार स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या जहाजांना रस्त्यातच पुन्हा यू-टर्न घेण्याची वेळ आली आहे. तर अनेक जहाजं याच मार्गावर अडकून पडले आहेत. ज्या जहाजांनी यू-टर्न घेतला, त्यामध्ये भारतीय आणि ग्रीस जहाजांचा समावेश आहे. दरम्यान जेव्हा स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद होता, त्यावेळी देखील भारतीय जहाजांना या मार्गाने कधी यूटर्न घेण्याची वेळ आली नव्हती, मात्र पहिल्यांदाच भारतीय जहाजांनी यू टर्न घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्यानं या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

शिपिंग डेटानुसार शनिवारी सकाळी पाच जहाजांनी या मार्गावरून यूटर्न घेतला आहे. यामध्ये भारतीय आणि ग्रीसच्या जहाजांचा समावेश आहे. जहाजांनी यूटर्न घेतल्यानंतर लगेचच बातमी समोर आली की इराणने पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे. हे जहाजं दुबईच्या जवळून स्ट्रेट ऑफ होर्मूजकडे निघाले होते. मात्र वाटेतच त्यांनी यूटर्न घेतला आहे. दरम्यान त्यामुळे आता पुन्हा एकदा ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Follow Us