AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ राज्यपाल बदलले, केंद्रीय मंत्री आता कर्नाटकचे गव्हर्नर, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

थावरचंद गेहलोत कर्नाटकचे राज्यपाल, हरी बाबू कंभमपती (Hari Babu Kambhampati) मिझोरमचे राज्यपाल, मंगुभाई छगनभाई पटेल (Mangubhai Chhaganbhai Patel ) मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Rajendra Vishwanath Arlekar) यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आठ राज्यपाल बदलले, केंद्रीय मंत्री आता कर्नाटकचे गव्हर्नर, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग
PM Narendra Modi, Thawarchand Gehlot
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 06, 2021 | 12:56 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली (Union Cabinet Expansion) सुरु असतानाच 8 राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन राज्यपाल नेमले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलोत (Thaawarchand Gehlot) यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  (Union Cabinet Expansion Minister Thaawarchand Gehlot appointed as Governor of Karnataka)

नवीन राज्यपाल कोण?

थावरचंद गेहलोत कर्नाटकचे राज्यपाल, हरी बाबू कंभमपती (Hari Babu Kambhampati) मिझोरमचे राज्यपाल, मंगुभाई छगनभाई पटेल (Mangubhai Chhaganbhai Patel ) मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Rajendra Vishwanath Arlekar) यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (PS Sreedharan Pillai ) यांची गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य (Satyadev Narayan Arya) यांची त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची झारखंडचे राज्यपाल, तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय (Bandaru Dattatraya) यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्नाटकच्या राज्यपालपदी थावरचंद

भाजपचे ज्येष्ठ नेते वाजूभाई वाला (Vajubhai Vala) यांच्या जागी थावरचंद गहलोत यांना कर्नाटकच्या राज्यपालपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वाजूभाई वाला हे 2014 पासून म्हणजेच जवळपास गेली सात वर्ष कर्नाटकचे राज्यपाल म्हणून काम करत होते. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची नियुक्ती झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणाची वर्णी लागते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थावरचंद गहलोत कोण आहेत?

थावरचंद गहलोत सलग दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार संसदीय मंडळ आणि भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य मोदी सरकारमध्ये 2014 पासून सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री 1996 ते 2009 पर्यंत मध्य प्रदेशातील शाजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार

दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाची धुरा गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांच्याकडे होती. त्यांच्या जागी आता मंगुभाई छगनभाई पटेल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सांभाळत होते.

संबंधित बातम्या :

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

(Union Cabinet Expansion Minister Thaawarchand Gehlot appointed as Governor of Karnataka)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...