मोठं खिंडार… भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, आता आमदारही फुटणार? गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठी खळबळ

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार राजपाल सैनी यांच्यासह अनेक नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, भाजपचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात असून लवकरच तेही पक्षात सामील होतील. या पक्षबदलामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात मोठं खिंडार पडणार असल्याचं चित्र आहे.

मोठं खिंडार... भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, आता आमदारही फुटणार? गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठी खळबळ
UP Elections 2027
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2026 | 3:12 PM

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. कधीकाळी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांची रांग लागायची. आता गंगा उलटी वाहू लागली आहे. भाजपचे असंख्य नेते आता समाजवादी पार्टीत येत आहेत. आज समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजप, राष्ट्रीय लोकदल, आजाद समाज पार्टी आणि निषाद पार्टीच्या असंख्य नेत्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपच्या एका माजी खासदारानेही सपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच येणाऱ्या काळात भाजपचे अनेक आमदार सपामध्ये येणार असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपचे माजी खासदार राजपाल सैनी, शामलीचे भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य हरबीर मलिक यांनी आज समाजवादी पार्टीत प्रवेश केला. आजाद समाज पार्टीचे पवन सैनी, निषाद पार्टीचे शुभेंद्र आचार्य आणि राष्ट्रीय लोकदलाचे संजीव प्रधान, राजेंद्र मलिक, विजेंद्र मलिक, शुभम मलिक आणि राजेंद्र सिंह यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. सिवान सैनीही समाजवादी पार्टीत आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loading...

ही तर सुरुवात

या नेत्यांचं पक्षात स्वागत केल्यानंतर अखिलेश यादव यांनी सूचक विधान केलं आहे. अनेक पक्षाचे नेते समाजवादी पार्टीत येत आहे. अजून आमदारांचं स्वागत झालेलं नाही. पण अनेक आमदार समाजवादी पार्टीच्या संपर्कात आहेत. अनेक राजकीय पक्षाचे नेते चर्चा करत असून त्यांना काय मिळणार? हेही पाहत आहेत, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं. भाजपला आता लोकांचं पाठबळ राहिलं नाही. भाजपवर लोक दु:खी आहेत. त्यामुळे भाजपमधून आमच्याकडे येणाऱ्यांची रांग लागली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

SSR म्हणजे RSS

यावेळी त्यांनी एसएसआरवरून भाजपवर हल्ला चढवला. जनतेत प्रचंड नाराजी असल्याने भाजप थेट सामना करण्यास धजावत नाहीये. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून षडयंत्र रचलं जात आहे, असं त्यांनी म्हटलंय. यावेळी एसएसआरचा उलटा अर्थ करून सांगितलं. एसएसआर उलटं केलं तर ते आरएएस होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत राजपाल सैनी

राजपाल सैनी हे भाजपचे बडे नेते आहेत. ते माजी खासदार आहेत. मात्र, त्यांना मीरापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट हवं आहे. मात्र, भाजपमधून तिकीट मिळणं शक्य नसल्याने त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. यापूर्वी सैनी हे बहुजन समाज पार्टीतही होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us