मोठी बातमी! इराणसोबतच्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितला थेट न्यूक्लिअर कोड? जगभरात मोठी खळबळ

अमेरिका आणि इराणने पुन्हा एकदा युद्धविराम वाढवला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये संघर्ष कायम आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! इराणसोबतच्या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितला थेट न्यूक्लिअर कोड? जगभरात मोठी खळबळ
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 4:34 PM

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव प्रचंड वाढल्याचं पहायला मिळत आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आणि या भीषण युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल 39 दिवस सुरू होतं, या युद्धामध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे इराणने आपल्या मिसाईल हल्ल्यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या नाकी नऊ आणले. अखेर 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली. हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी करण्यात आला होता. परंतु आता युद्धविरामाचा वेळ संपल्याने पुन्हा एकदा युद्धविरामाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीत मात्र स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये प्रचंड तणाव पहायला मिळत आहे. एकीकडे इराणने हा मार्ग बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी लावली आहे.

याचदरम्यान एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला असतानाच आता सीआयएच्या माजी अधिकाऱ्यानं मोठा दावा केला आहे. लॅरी जॉन्सन असा या अधिकाऱ्याचं नाव आहे, या अधिकाऱ्यानं केलेल्या दाव्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. व्हाइट हाउमध्ये आयोजित वार सिच्युएशन बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूक्लियर कोडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता असा दावा जॉन्सन यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सिच्युएशन रूमच्या बाहेर पाठवण्यात आलं असा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. मात्र अद्याप या माजी अधिकाऱ्याने केलेल्या दाव्याला व्हाईट हाऊसकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाहीये.

ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा इराणने अमेरिकेचं फायटर जेट पाडलं होतं, अमेरिकेचा एक पायलट आणि एक कॅबिन क्रू इराणमध्ये अडकले होते, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी सिच्युएशन बैठकीत न्यूक्लियर कोड मागितला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सिच्युएशन बैठकीमधून बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान वॉल स्ट्रीट जर्नरकडून एक रिपोर्ट छापण्यात आला आहे, या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा इराणने अमेरिकेचं फायटर जेट पाडलं होतं, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे सिच्युएशन रूमध्ये आले होते, ते खूप घाबरलेले दिसत होते. मात्र त्यानंतर त्यांना काही वेळातच या रूममधून बाहेर काढण्यात आलं. मात्र ते का काढण्यात आलं? याबाबत या रिपोर्टमध्ये कोणताही दावा करण्यात आलेला नाहीये. परंतु या माजी अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

Follow Us