मोठी बातमी! अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाची थेट अमेरिकेकडून दखल; पहिली प्रतिक्रिया काय?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतातील CJP आंदोलने आणि मानवाधिकाराच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. रुबियो म्हणाले की, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि अमेरिका त्यात हस्तक्षेप करणार नाही. संयुक्त राष्ट्र तसेच काही अमेरिकन खासदारांनी चिंता व्यक्त केल्यावर हे विधान आले आहे.

मोठी बातमी! अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाची थेट अमेरिकेकडून दखल; पहिली प्रतिक्रिया काय?
abhijit dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 2:45 PM

भारतात सुरू असलेलं अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आणि मानवाधिकारावर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर अखेर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी यावर भाष्य केलं आहे. हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. अमेरिकेतही असे आंदोलन होत असतात, असं रुबियो यांनी स्पष्ट केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या काही विशेष रॅपोर्टेयर्सनी भारतातील आंदोलना दरम्यान होणारी पोलिसांची कारवाई आणि मानवाधिकारावर चिंता व्यक्त केली होती. तसेच अमेरिकेच्या 6 खासदारांनी हा मुद्दा उचलून धरण्याची मागणी मार्को रुबियो यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर रुबियो यांचं हे विधान आलं आहे.

मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मानवाधिकाराच्या मुद्द्याचा वापर राजकीय दबाव वाढवण्यासाठी आणि काही ठरावीक देशांना निशाणा बनवण्यासाठी करता कामा नये, असं भारताने सुनावलं होतं. भारताने संयुक्त राष्ट्राच्या विशेष रॅपोर्टेयर्सच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे. भारताकडे चौकशी न करता आरोप केले जात आहे. भारताची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडल्या जात सल्याबद्दलही भारताने सवाल केला आहे. मानवाधिकाराशी संबंधित मुद्द्यांवरील चर्चा तथ्यांच्या आधारे केली पाहिजे. एखाद्या देशाला ठरवून टार्गेट केलं नाही पाहिजे, असं भारताने म्हटलं आहे.

Loading...

तीन दिवसाच्या दौऱ्यावर

अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो 20 ऑक्टोबर रोजी तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ते काल मुंबईत होते. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या दौऱ्यात भारत-अमेरिका व्यापार करार, ऊर्जा सहकार्य आणि सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. रुबियो गुजरातच्या जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिफायनरीला भेट देण्याची शक्यताही आहे. अमेरिका भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवणे आणि व्हेनेज्यूएलाच्या कच्च्या तेलाच्या प्रोसेसिंगशी संबंधित पर्यायांवर चर्चा करत आहे.

सहा खासदारांची मागणी

रुबियो भारतात येण्यापूर्वी प्रमिला जयपाल, इल्हान उमर, जिम मॅकगवर्न, रशीदा तलीब, एलेनोर होम्स नॉर्टन, जीसस गार्सिया या सहा खासदारांनी त्यांची भेट घेऊन भारतातील सीजेपीच्या आंदोलननावर होत असलेली कारवाई आणि मानवाधिकाराचा मुद्दा उचलण्याची मागणी केली होती. भारताशी चर्चे करतेवेळी या घटनांवर चिंता व्यक्त करण्याची विनंती या खासदारांनी रुबियो यांना केली होती. मात्र, रुबियो यांनी प्रत्यक्षात हा मुद्दा भारताच्या अंतर्गत बाब असल्याचं सांगून त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us