स्मृती इराणी यांचं कमबॅक होणार, भाजपकडून राज्यसभेवर कोण जाणार? या नावांची चर्चा

राज्यसभेच्या जागेवर स्मृती इराणी यांचं कमबॅक होण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर कोण जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

स्मृती इराणी यांचं कमबॅक होणार, भाजपकडून राज्यसभेवर कोण जाणार? या नावांची चर्चा
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 10:01 PM

उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून राज्यसभेवर कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजप नव्या चेहऱ्यांना राज्यसभेवर संधी देण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर दोन माजी केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी आणि हरिश द्विवेदी यांना राज्यसभेवर जाण्यास संधी मिळू शकते. बीएल वर्मा यांना उमेदवारी मिळाली नाही, तर राजवीर सिंह राजू यांना उमेदवारी मिळू शकते.

उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या 10  जागांवर निवडणुका होणार आहेत. राज्यसभा खासदार हरदीप पुरी यांचाही कार्यकाळ संपणार आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, यावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याचे बोलले जात आहे. हरिश द्विवेदी यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रीय नेत्यांचा हरिश यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढला आहे. स्मृती इराणी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यांच्यामुळे महिला नेतृत्व पक्षाला मिळू शकते. तसेच गीता शाक्य आणि सीमा द्विवेदी यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

गीता यांच्या जागी ममतेश शाक्य यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ओबीसी कोट्यातून प्रकाश पाल यांची चर्चा होत आहे. ते पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. दलित चेहरा म्हणून पासी समाजातील नेत्याला पसंती मिळू शकते. पक्षाकडून पासी समाजाचे विद्यासागर सोनकर यांना उमेदवारी मिळू शकते. आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरण देखील भाजप साधण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवारांची घोषणा तीन ते चार ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपमधील सर्व बड्या नेत्यांनी राज्यात बैठकांचा धडाका लावला आहे. या निवडणुकीसाठी विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही बैठकांचा धडाका सुरू आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सुचना दिल्या आहेत. या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यसभेच्या जागांवरील निवडणुकीकडे असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us