AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi: आता भारताचे दहशतवादाला चोख प्रत्युत्तर, पण पूर्वी… ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर असा साधला निशाणा

PM Modi Man Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशतवादाविरोधातील कारवाईवरून काँग्रेसवर निशाणा साधला. 138 व्या भागात त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, जातनिहाय जनगणना, दहशतवाद यासह इतर अनेक मुद्यांना हात घातला.

PM Modi: आता भारताचे दहशतवादाला चोख प्रत्युत्तर, पण पूर्वी... 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर असा साधला निशाणा
काँग्रेसचे नाव न घेता मोदींचा निशाणा
| Updated on: Sep 27, 2026 | 12:56 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ मधून काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. या कार्यक्रमाच्या 138 व्या भागात त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, जातनिहाय जनगणना, दहशतवादासह इतर अनेक मुद्यांना हात घातला. उद्या म्हणजे 28 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. पण आता तो पूर्वीसारखा भारत राहिला नाही. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना करारा जवाब, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यांनी या विषयावरून नाव न घेता काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. पूर्वी बॉम्बस्फोटाच्या मालिका होणे हे एक साधारण गोष्ट होती. पण आता भारत दहशतवाद सहन करत नाही. आम्ही दहशतवादावर झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारल्याचे पीएम मोदी म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्षे

‘मन की बात’ च्या 138 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट येथील एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर, 2016 रोजी भारतीय लष्कारने नियंत्रण सीमेवर अतुल्य शौर्य गाजवले. ते पाहून जग थक्क झाले. सर्जिकल स्ट्राईकमुळे डंकेच्या चोटवर संपूर्ण जगात भारताच्या दहशतवादविरोधातील धोरणाचे उदाहरण समोर आले, असे कौतुक मोदी यांनी केले.

या एका दशकात बालाकोट एअर स्ट्राईकपासून ते ऑपेरशन सिंदूरपर्यंत भारताने वारंवाद स्पष्ट संदेश दिला आहे. जर भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. आता भारताने दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. त्याचे परिणामही जग पाहत आहे, हे सांगायला मोदी विसरले नाहीत.

मुंबई 26/11 वरून काँग्रेसवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बॉम्बस्फोट मालिकांचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधाला. एक वेळ अशी होती की, भारता बॉम्बस्फोट मालिका होणे ही सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या या महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर, 2008 रोजी दिल्लीत बॉम्बस्फोटाची मालिका झाली. अनेक निर्दोष, निष्पाप माणसं मारल्या गेली. काही आठवड्यानंतर मुंबईत 26/11 चा इतका मोठा हल्ला झाला होता.’, असे मोदी म्हणाले.

यापूर्वी दहशतवादी हल्ला झाला की, पाकिस्तावर कारवाईची मागणी व्हायची. पण त्यावेळी त्यावर इतके लक्ष देण्यात येत नव्हते. वेळ काढूपणा करण्यात येत होता. पण आताचा भारत हा दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबवतो आणि आपण त्याचे परिणामही पाहत आहात, असे मोदी म्हणाले.

जातनिहाय जनगणनेविषयी म्हणाले काय?

आजच्या मन की बातमध्ये मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलाल. देशातील सर्व राज्यात, केंद्र शासित प्रदेशात जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 32 कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरूवात चमोली जवळील माणा गावापासून झाली होती. माणा हे देशातील पहिले गाव मानले जाते. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 15 ऑगस्ट रोजी देशातील नागरिकांना मी जनगणनेसाठी वेळ देण्याची विनंती केली होती, असं मोदी म्हणाले.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी