Congress News : मुख्यमंत्री राहिलेल्या बड्या नेत्याने तडकाफडकी दिला काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा, नेमकं काय घडलय?

Congress News : काँग्रेसच्या बड्या नेत्याने आज तडकाफडकी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. महत्वाचं म्हणजे या नेत्याने एका महत्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघणार आहे.

Congress News : मुख्यमंत्री राहिलेल्या बड्या नेत्याने तडकाफडकी दिला काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा, नेमकं काय घडलय?
Congress
| Updated on: Sep 12, 2026 | 9:48 AM

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेसमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. हरीश रावत यांचे PA चंदन सिंह जीना यांच्या ठिकाणांवरील ED च्या छापेमारीनंतर बरोबर एकदिवसाने हरीश रावत यांनी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा भ्रष्टाचाराविरुद्ध जो संघर्ष सुरु आहे, त्यावर माझ्यामुळे कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु नये असं रावत म्हणाले. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. 2016 च्या ग्राम पंचायत विकास अधिकारी परीक्षा घोट्याळ्याशी संबंधित असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यात चंदन सिंह जीना यांच्या घराचा सुद्धा समावेश होता. ED नुसार, 32 लाख रुपये बेहिशोबी रक्कम, जवळपास 200.5 ग्रॅम सोनं आणि 12 लग्जरी घड्याळं जप्त केली. ED ने जीना आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित बँक खात्यातील 52.16 लाख रुपये गोठवले. हरीश रावत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जीना हे त्यांचे OSD होते. आता ते रावत यांचे PA म्हणून काम करत आहेत.

“माझ्या सहकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने जप्त केल्याच्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. त्याचं सत्य चौकशीनंतरच समोर येईल. चंदन सिंह जीना आपले जुने सहकारी असल्याचं रावत यांनी सांगितलं. भरती परीक्षेच्या घोटाळ्याशी संबंधित कुठलाही आरोप सिद्ध झाला, तर ती माझ्यासाठी लाजिरवाणी बाब ठरेल. अशा आरोपांवर माझा अजिबात विश्वास नाहीय” असं हरीश रावत म्हणाले.

नरेटिव बनवण्याचा प्रयत्न

निवडणुकीआधी वातावरण बिघडवण्यासाठी आणि एक नवीन नरेटिव बनवण्यासाठी माझ्याऐवजी माझ्या सहकार्याच्या ठिकाणावर कारवाई करण्यात आली असा आरोप रावत यांनी केला. पक्षाची प्रतिष्ठा आणि संघर्षावर कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी प्रदेश कार्यकारिणी आणि काँग्रेस कार्यसमिती दोन्ही पदांचा त्याग करत आहे असं हरीश रावत यांनी स्पष्ट केलं.

42 हजारपेक्षा जास्त सरकारी पदांची भरती निघालेली

आपल्या कार्यकाळाच उल्लेख करत हरीश रावत म्हणाले की, “माझ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 42 हजारपेक्षा जास्त सरकारी पदांची भरती निघालेली. नियुक्ती प्रक्रियेत अजाणतेपणी काही चूक झाली असेल, तर त्यासाठी मी राज्याची माफी मागतो”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us