
बहुप्रतिक्षित वंदेभारत एक्सप्रेसच्या स्लिपर व्हर्जनची यशस्वी चाचणी पश्चिम-मध्य रेल्वेच्या राजस्थानातील कोटा – नागदा सेक्शनमध्ये करण्यात आली. या ‘वंदे भारत स्लिपर ट्रेन’च्या ट्रायल रनचा एक व्हिडीओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेनच्या स्टेबिलीटी ( स्थिरता ) तपासण्यासाठी या ट्रेनची ग्लासात पाणी ठेऊन वॉटर टेस्ट करण्यात आली. विशेष म्हणजे ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावूनही या ग्लासमधील पाणी डचमळून बाहेर पडले नाही. वंदेभारत स्लिपर ट्रेन रात्रीचा लांबचा प्रवास आरामात झोपून करता येण्यासाठी तयार केलेली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सोशल मीडियावर ‘वंदे भारत स्लिपर ट्रेन’च्या ट्रायल रनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ही ट्रेन कोटा- नागदा सेक्शनमध्ये ताशी 180 किमी वेगाने जाताना दिसत आहे. ट्रेनच्या स्थिरतेची चाचणी करण्यासाठी ग्लासात पाणी ठेवून वॉटर टेस्ट देखील करण्यात आली. या वेळी ग्लासात पाणी ठेवून त्या ग्लासांवर ग्लास ठेवून चाचणी करण्यात आली. ट्रेनचा वेग ताशी 180 किमीचा असूनही ग्लासातून पाणी बाहेर पडले नाही.
येथे पाहा पोस्ट –
Vande Bharat Sleeper tested today by Commissioner Railway Safety. It ran at 180 kmph between Kota Nagda section. And our own water test demonstrated the technological features of this new generation train. pic.twitter.com/w0tE0Jcp2h
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 30, 2025
अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर ( ट्वीटर ) पोस्ट करीत म्हटले की आज कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टीने वंदे भारत स्लिपरच्या ट्रायलचे इन्सपेक्शन केले. ट्रेन कोटा – नागदा सेक्शनच्या ट्रॅकवर दर ताशी 180 किमी वेगाने धावली. वॉटर टेस्टने या नव्या पिढीच्या ट्रेनच्या तांत्रिक वैशिष्ट्यांना दाखवले.’ व्हिडीओ ट्रेनचा आत चित्रित केला असून ज्यात मोबाईलच्या स्क्रीनवर स्पीडो मीटरमध्ये 182 किमी/प्रती तास ट्रेनचा वेग नोंदला गेला आहे.
वंदे भारत स्लिपर ट्रेनने या कोटा-नागदा सेक्शनच्या रुळांवर इतका मोठा वेग धारण करुन ट्रेनच्या डेकवर एकावर एक रचलेल्या ग्लासामधील पाणी खाली पडले नाही. ज्यामुळे ट्रेनची स्टेबिलीटी आणि लो व्हायब्रेशन ( स्थिरता चाचणी ) टेस्ट यशस्वी झालेली दिसत आहे. सध्या धावत असलेल्या सर्व वंदेभारत ट्रेन ( चेअर कार ) चे डिझाईन 180 किमी / प्रति तास असून ऑपरेशन स्पीड 160 किमी/प्रति तास आहे. रेल्वे मंत्रालयाच्या नुसार ट्रेनचा सरासरी वेग ट्रॅकची जिओमेट्री, मेटेनन्स आणि मार्गातील थांब्यांच्या संख्येवर अवलंबून असते.