अखेर जागाची प्रतिक्षा संपली, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी हटवणार

इराण अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या संदर्भात ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

अखेर जागाची प्रतिक्षा संपली, ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी हटवणार
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 10:05 PM

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र अजूनही दोन्ही देशांमध्ये संघर्ष कायम आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये दोन्ही देशांकडून एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरू आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मूज आणि इराणच्या बंदरांवर लावलेली नाकेबंदी हटवेल असं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुज दोन्ही दिशांनी ओपन झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आमची नाकेबंदी हटवू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया साईट असलेल्या ट्रूथवर या संदर्भात पोस्ट केली आहे. मात्र यासोबतच त्यांनी काही अटी देखील घातल्या आहेत. मला वाटतं इराणने अमेरिकेच्या या अटी मान्य केल्या पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या करारावर व्हाईट हाउसच्या सिच्युएशन रूममध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, इराणला अमेरिकेची ही अट मान्य करावीच लागेल की ते कधीही न्यूक्लिअर बॉम्ब बनवणार नाहीत. आम्हाला वाटतं आता स्ट्रेट ऑफ होर्मूज लवकरात लवकर ओपन करायला पाहिजे. कोणत्याही व्यापारी जहाजांना टोल न देता त्यांना या मार्गाने विनाअडथळा प्रवास करता आला पाहिजे. मला वाटतं स्ट्रेट ऑफ होर्मूज दोन्ही मार्गाने सुरू व्हावा, त्यामुळे आम्ही देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी उठवू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणने या मार्गामध्ये जे पाण्यात सुरूंग पेरून ठेवले आहेत, त्यातील अनेक सुरूंग आम्ही आमच्या अंडरवॉटर माइन स्वीपर्सच्या मदतीने आधीच नष्ट केले आहेत. आता इराने उर्वरीत सुरुंग नष्ट करावेत. आम्ही या ठिकाणावरून नाकेबंदी उठवू हा मार्ग आता व्यापारी जहाजांसाठी ओपन झाला पाहिजे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Follow Us