AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांनंतर आता खासदारही फुटणार? ममता बॅनर्जाींना पुन्हा मोठा हादरा, 18 खासदार…

West Bengal Politics : बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदारांप्रमाणे आता खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आता जवळपास 18 खासदार आमदारांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.

आमदारांनंतर आता खासदारही फुटणार? ममता बॅनर्जाींना पुन्हा मोठा हादरा, 18 खासदार...
TMC MP May leave Mamata BanerjeeImage Credit source: Google
| Updated on: Jun 05, 2026 | 4:26 PM
Share

पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. टीएमसीच्या 58 आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वात गट स्थापन केला असून ते आता विरोधीपक्षनेते बनले आहे. आमदारांप्रमाणे आता खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आता जवळपास 18 खासदार आमदारांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभा खासदारांच्या या गटाचे नेतृत्व एका अत्यंत वरिष्ठ खासदाराकडे जाण्याची शक्यता आहे, जे बराच काळ पक्षात स्वतःकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टीएमसीच्या आमदारांप्रमाणे आता खासदारही फुटण्याची शक्यता आहे. या फुटीमागे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वरिष्ठ टीएमसी खासदारांशी करण्यात आलेले गैरवर्तन हे कारण असल्याचे मोठं कारण मानलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काही टीएमसी खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता आमदारांनी नवीन गट स्थापन केल्यानंतर खासदारही नवीन गट स्थापन करण्याची शक्यता आहे.

लोकसभेत टीएमसीचे किती खासदार आहेत?

लोकसभेत टीएमसीचे 28 खासदार आहेत. यातील 18 खासदार दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सूत्रांचं म्हणणं आहे की टीएमसीच्या राज्यसभा गटात फुटीची शक्यता फार कमी आहे. कारण, राज्यसभेतील बहुतेक खासदार ममता बॅनर्जी यांच्याशी निष्ठावान आहेत आणि त्यांच्याविरोधात जाण्याची शक्यता कमी मानली जाते. राज्यसभेत टीएमसीचे 13 खासदार आहेत.

आमदारांच्या गटाचा पक्षावर दावा

बंगालमध्ये तृणमूलचे आमदार आधीच दोन गटांत विभागलं गेलं आहे. आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील 60 आमदारांचा बंडखोर गट स्वतःलाच ‘खरा’ तृणमूल पक्ष म्हणत आहे. या गटाने ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली असून विधानसभा अध्यक्षांकडून त्याला मान्यताही मिळाल्याचा दावा केला जात आहे. या गटाने ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला थेट आव्हान दिलं आहे.

ऋतब्रत बॅनर्जी काय म्हणाले?

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी म्हटले की, माझ्या नेतृत्वाखालील टीएमसी गटाला मिळणारा पाठिंबा आगामी वाढतच जाईल. पश्चिम बंगाल विधानसभेतील टीएमसीच्या मोठ्या संख्येने आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे आणि हा आकडा आणखी वाढेल.’ दरम्यान, आता आमदारांनंतर खासदारांनी जर ममता बॅनर्जी यांची साथ सोडली तर पक्षाला हा मोठा धक्का असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...