जगातील खतरनाक सापही या गोष्टीला थरथर कापतात, आसपासही फिरकत नाहीत; हैराण व्हाल
जगातील विषारी सापही काही विशिष्ट गोष्टींना आणि परिस्थितीला खूप घाबरतात हे तुम्हाला माहीत आहे का? इतर सापांपासून ते मोठ्या शिकारी प्राण्यांपर्यंत, तसेच तीव्र प्रकाश, मोठा आवाज आणि तीव्र दुर्गंधीमुळे साप दूर राहतात. आग आणि उष्णता तर त्यांच्यासाठी जीवघेणी असते. सापांच्या या अज्ञात भीतीमुळे ते स्वतःचे संरक्षण करतात.

साप हा सर्वात खतरनाक विषारी प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे घराच्या आसपास किंवा कुठेही साप दिसला तर लोक पळ काढतात. साप कधीही उलट हल्ला करू शकतो, त्यामुळेच लोक त्याच्यापासून सावध असतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणूस जेवढा सापाला घाबरतो, तेवढाच सापही माणसाला घाबरतो. साप माणसालाच नव्हे तर अनेक गोष्टींना घाबरतो. त्या पाहिल्या की तिकडे फिरकतही नाही. साप कशा कशाला घाबरतो, याचाच घेतलेला हा आढावा.
एका संशोधनानुसार, साप सर्वाधिक सापांनाच घाबरतात. खासकरून एक साप दुसऱ्या प्रजातीच्या सापाला घाबरत असतो. साप हा क्षेत्रीय प्राणी आहे. त्यामुळेच सापांमध्ये नेहमी संघर्ष होत असतो. दरम्यान, काही प्रजातीचे साप, जसे की किंग कोबरा आणि वायपरसहीत इतर साप दुसऱ्या सापाला घाबरत नाहीत. इतर सापांच्या तुलनेत या प्रजातीचे साप अधिक आक्रमक असतात. त्यामुळे त्यांचाच धोका इतरांना अधिक असतो. धोका जाणवताच ते इतर सापांवर हल्ला करतात.
शिकारी प्राण्यांची भीती
साप नेहमीच आपल्यापेक्षा छोट्या प्राण्यांची शिकार करतात. पण साप मोठ्या शिकारी प्राण्यांना खूप घाबरतात. त्यामुळेच भीतीपोटी साप दिवसा गुहेत किंवा बिळांमध्ये लपून राहतात. जेव्हा धोका दिसून लागतो तेव्हा साप आपल्या ग्रंथीमधून दुर्गंधी युक्त तरल पदार्थ सोडतात. तसेच शिकारी प्राण्यांना घाबरवण्यासाठी साप सतत फुत्कारत असता. किंवा फणा काढून डोलत असतात. काही प्राणी आणि पक्षी नेहमीच सापांची शिकार करतात. यात ससाणा, गरुड, कोल्हा, मुंगूस आणि रेकूनचा समावेश आहे.
प्रचंड प्रकाश
साप प्रकाशाबाबत अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळेच ते प्रकाश असलेल्या जागेपासून दूर राहतात. सापांना रात्रीच्या काळोखात दिसतं. त्यामुळे दिवसाचा प्रकाश त्यांच्या डोळ्यासाठी त्रासदायक असतो. अनेकदा तर प्रखर प्रकाशात साप अंधळेही होतात. त्यामुळेच साप प्रकाशाला भीतात.
मोठा आवाज
साप प्रचंड आवाज किंवा गोंगाटाला खूप घाबरतात. रिसर्चनुसार, साप त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेनुसार अन्नाच्या शोधात असतात. शिकाऱ्यांपासून दूर राहतात. अशावेळी त्यांच्या आजूबाजूला मोठा गोंगाट झाला तर ते तिथून निघून जातात आणि सुरक्षित ठिकाणी ठिय्या मांडतात. प्रचंड आवाजामुळे सापांच्या कानाला नुकसानही होतं.
प्रखर वास
साप प्रखर वासालाही घाबरतात. प्रखर दुर्गंधीमुळे त्यांची दिशा ठरवण्याची क्षमता कमकुवत होते. एखाद्या जागी प्रचंड दुर्गंधी येत असेल तर त्यांना अन्न शोधण्यास अडचणी येतात. ज्या ठिकाणी प्रचंड वास असेल अशा ठिकाणी साप राहत नाहीत. लसून, लिंबू, दालचीनी आणि मिंटच्या वासाला साप अधिक घाबरतात. तसेच तापमानातील बदलामुळेही साप घाबरून जातात.
प्राण्यांची भीती
याशिवाय साप काही प्राण्यांना घाबरतात. कुत्रा, मांजर, पाल, गिधाड, ससाणा, गरुड, कोल्हा, मुंगूस आणि रेकूनला साप घाबरतात. ही सर्व जानवरे निसर्गत:च शिकारी आहेत. मांजरी सुद्धा सापांची शिकार करण्यात माहीर आहेत.
आगीची भीती
साप आगीलाही खूप घाबरतात. सापाची त्वचा खूप नाजूक असते. आग आणि वाढत्या तापमानामुळे त्यांच्या त्वचेला नुकसान होऊ शकतं. एवढेच नव्हे तर त्यांचा मृत्यूही होतो. त्यामुळे साप आग आणि तापमानाला घाबरतात.