Delhi Blast: दिल्ली ब्लास्टमध्ये आतापर्यंत काय काय झाले ? 5 मोठे अपडेट्स…

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा एका कारमध्ये मोठा ब्लास्ट झाला आहे. सोमवारी सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर हा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर काय काय घडले पाच मुद्यात समजून घेऊयात...

Delhi Blast: दिल्ली ब्लास्टमध्ये आतापर्यंत काय काय झाले ?  5 मोठे अपडेट्स...
Delhi Blast Updates
| Updated on: Nov 10, 2025 | 9:45 PM

Delhi Blast Updates: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी एका कारमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला आहे. सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ला मेट्रो गेट क्रमांक १ जवळ हुंडई – I20 कारमध्ये हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.या स्फोटानंतर लोक जीव वाचवण्यासाठी पळाले. त्यामुळे सुरुवातीला लोकांना हा सिलींडर ब्लास्ट वाटला. आतापर्यंत या स्फोट प्रकरणात काय झाले हे पाहूयात..

दिल्ली पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली आहे. सोमवारी सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर मोठा धमाका झाला. त्यानंतर एकच अफरातफरी माजली. लोकांची आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ झाली. कोणाला काय करावे हे समजत नव्हते. अखेर काय झाले हे कोणालाच कळत नव्हते. सुरुवातीला लोक सिलींडर ब्लास्ट समजत होते. परंतू जसजसा वेळ गेला तसतसे हा मोठा ब्लास्ट असल्याचे स्पष्ट झाले. हा अतिरेकी हल्ला आहे का ? कोणा असामाजिक तत्वाचा यात हात आहे ? या संदर्भात पोलिसांचे वक्तव्य रात्री उशीरा आले की प्रथमदर्शनी हा ब्लास्ट असल्याचे स्पष्ट झाले. चला तर या प्रकरणातील ५ महत्वाचे अपडेट्स काय ?

1. कुठे आणि केव्हा झाला ब्लास्ट : लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक – १ च्या जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये जोरदार धमाका झाला. धमाक्यानंतर आगीचे लोळ उठले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी आजूबाजूची अन्य तीन- चार वाहने देखील आली. हा ब्लास्ट सायंकाळी ६.५२ वाजता झाला.

2. किती लोक जखमी झाले : आता पर्यंत या ब्लास्टमध्ये १३ लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असून २४ जण जखमी झाले आहेत. जखमींना Lok Nayak Jai Prakash रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या स्ट्रीट लाईट्स देखील क्षतिग्रस्त झाल्या.

3. दिल्लीत हाय अलर्ट जारी : सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस आणि फायरब्रिगेटची पथके घटनास्थळी पोहचले. NIAच्या पथकाने घटनास्थळी तपास सुरु केला असून फोरेन्सिक पथकांनी तपासणी सुरु केली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.

4.अमित शाह यांनी घेतली माहिती : या संपूर्ण घटना क्रमाची माहिती दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलछा यांनी देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांना दिली.गृहमंत्रालयाने या घटनेवर नजर ठेवली आहे आणि तपासाचे आदेश दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली.

5. मुंबई, पुणे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढविली : दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर मुंबई, पुणे सारख्या महानगरात हाय अलर्ट जारी करण्यात आल्या. उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली आहे. प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

येथे पोस्ट पाहा –