AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खूर्चीत बसलेलो असताना खाली पडलो, आयुष्यात असा धमाका पाहीला नाही…’ प्रत्यक्षदर्शींनी लाल किल्ला स्फोटाचा अनुभव सांगितला

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सिग्नलला उभ्या असलेल्या कारमध्ये सोमवारी ब्लास्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटाच्या प्रत्यक्षदर्शीनी आपले थरारक अनुभव सांगितले आहेत.

'खूर्चीत बसलेलो असताना खाली पडलो, आयुष्यात असा धमाका पाहीला नाही...' प्रत्यक्षदर्शींनी लाल किल्ला स्फोटाचा अनुभव सांगितला
delhi blast
| Updated on: Nov 10, 2025 | 9:44 PM
Share

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या मोठ्या स्फोटाने राजधानी हादरुन गेली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की प्रत्यक्षदर्शी जमीनीवर पडले. कारच्या चिंधड्या उडाल्या. आगीचे लोळ आकाशात गेले आणि चारी बाजूंनी धुराने परिसर काळवंडला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले असून जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले असून तपास सुरु आहे.

लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी ६.५२ वाजता झालेल्या धमाक्याने राजधानी दिल्ली हादरली आहे. हा धमाका इतका भीषण होता की आजूबाजूच्या १० ते १२ कारचा चक्काचूर झाला. लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक एक जवळील पार्किंगमध्ये असलेल्या इको कारमध्ये हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. सायंकाळी पार्किंगमधून कार बाहेर काढण्यासाठी आलेले नागरिक यात ठार आणि जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर खळबळ उडाली असून रस्त्यावर काचांचा रक्ताचा सडा पडला.

हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक १ च्या जवळ झाल्याचे म्हटले जात आहे. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की इमारतीच्या खिडक्या उघडल्या. एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आपण दुकानात बसला असता अचानक इतका मोठा धमाका झाला की हादऱ्याने खुर्चीतून आपण खाली पडलो. आयुष्यात इतका भयानक धमाका कधी ऐकला नाही असेही त्याने सांगितले.

दिल्लीच्या ब्लास्टने अफरातफरी

या स्फोटाचे दुसरे एक साक्षीदार राजधर पांडे यांनी सांगितले की ते घरी होते. जेव्हा छतावर गेलो तर पाहिजे आगीचे लोळ आकाशात उठले. आग इतकी भीषण होती की चारी बाजूंनी अफरातफर माजली होती.

एका इको व्हॅनमध्ये हा ब्लास्ट झाल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही.धमाक्यानंतर जखमी लोकांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे.तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने अनेक जखमींची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले आहे.

अनेक लोकांचा मृत्यू

घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळावर पोहचले. या संपूर्ण परिसराला सील करण्यात आला आहे. दिल्ली हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. एनआयए आणि फोरेन्सिक टीम घटना स्थळी दाखल झाले आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....