घरात सापाची कातीन दिसली तर काय करायचं? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक, पडू शकतं चांगलंच महागात

आपल्यापैकी प्रत्येकालाच सापाची भीती वाटते, साप विषारी असो किंवा बिनविषारी खबरदारी तर घेतलीच पाहिजे, मात्र अनेकदा आपल्या घरात सापाची कातीन पडलेली दिसून येते, तुम्हला माहिती आहे का अशावेळी नेमकं काय करायचं?

घरात सापाची कातीन दिसली तर काय करायचं? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक, पडू शकतं चांगलंच महागात
snakes
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 04, 2026 | 5:23 PM

आपल्याला अनेकदा आपल्या घरात, किंवा परिसरामध्ये साप आढळून येतो. जर घरात साप घुसला असेल तर भीती वाटणं सहाजिक गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर साप घरात घुसण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण उष्णता वाढल्यानंतर साप थंड जागेचा शोध घेतात, थंड जागेचा शोध घेत असताना ते अनेकदा घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का? की सर्वच साप हे विषारी नसतात, भारतामध्ये हजारो सापांच्या जाती आढळतात, त्यापैकी अगदी काही साप हेच विषारी आहे, मात्र साप विषारी असो अथवा बिनविषारी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.

मात्र आज आप ज्याची माहिती घेणार आहोत ती म्हणजे जर घरात सापाची कातीन आढळून आली तर नेमकं काय करायचं? आधी जाणून घेऊयात सापाची कातीन नेमकी काय असते. सापाची कातीन म्हणजे एक प्रकारची सापाची डेड स्किन असते. काही ठराविक महिन्यानंतर सापाच्या अंगावर एक विशिष्ट प्रकारचा थर जमा होण्यास सुरुवात होतो. जेव्हा हा थर वाढत जातो, तेव्हा सापाच्या हालचाली मंदावत जातात. त्यानंतर काही ठरावीक दिवसांनी ही डेड स्कीन आपोआप सापांपासून वेगळी होते आणि पुन्हा एकदा सापाला आपली नौर्सिगक गती प्राप्त होते. सापाची ही स्कीन साधारणपणे एखाद्या जाळ्या सारखी दिसते.

Loading...

जर तुमच्या घरात तुम्हाला सापाची कातीन दिसून आली तर नक्कीच हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू शकतो. कारण ज्या परिसरात सापाची कातीन आहे, त्याच परिसरात तो साप असल्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला अशी कातीन कुठे दिसली तर सावध राहाणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सापाची अशी कातीन कुठे दिलसी तर तिला हात लावू नका, एखाद्या काठीच्या मदतीने तुम्ही ही स्कीन घराच्या बाहेर फेकू शकता.

या कातीनी वरून देखील तुम्हाला जर सापांबद्दल माहिती असेल तर तुम्ही तो साप नेमका कोणता असू शकतो याचा अंदाज लावू शकता.  म्हणजेच साप विषारी आहे की बिनविषारी, साप किती मोठा आहे, याचा अंदाज देखील तुम्हाला या सापाच्या कातीनीवरून सहज येऊ शकतो. फार झालं तर तुम्ही सर्पमित्रांच्या मदतीने त्या परिसरात त्या सापाचा शोध देखील घेऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us