AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही खास जडीबूटी म्हणजे सापांसाठी लक्ष्मण रेखाच, साप घराची पायरी सुद्ध ओलंडणार नाही, दूरूनच पळून जातो

जगभरात विविध प्रजातीचे साप आढळतात, भारतामध्ये देखील सापांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. यातील काही प्रजाती या विषारी आहेत, त्यामुळे सांपापासून आपला बचाव करणं गरजेचं असतं. अशा काही वनस्पती असतात ज्यामुळे तुमचा सापांपासून बचावर होऊ शकतो.

ही खास जडीबूटी म्हणजे सापांसाठी लक्ष्मण रेखाच, साप घराची पायरी सुद्ध ओलंडणार नाही, दूरूनच पळून जातो
snakesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 01, 2026 | 10:22 PM
Share

आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर येण्याचं प्रमाण वाढतं, याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापते. त्यामुळे सापांच्या बिळातून गरम वाफा निघतात आणि त्याचा सापांना त्रास होतो. त्यामुळे अशावेळी साप बिळातून बाहेर निघतात आणि अशी एखादी सुरक्षित आणि थंड हवेची जागा शोधतात, जिथे त्यांना सहज आश्रय घेता येईल, त्यांना लपता येईल. साप शक्यतो अशावेळी घरात घुसतात आणि जिथे अडगळ असते अशा ठिकाणी लपून बसतात. अशा ठिकाणी साप सहज दिसत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये सर्पदंशाचा धोका देखील वाढतो. दरम्यान जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्यावर उपाय म्हणजे दुसरा कोणताही उपचार न करता थेट अशा व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळून देणं, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं  हाच आहे.

परंतु साप आपल्या घरात येऊ नये यासाठी देखील आपल्याला काही उपाय योजना नक्कीच करता येतील, त्यामध्ये जर साप आपल्या घरात येण्याच्या घटना या वारंवार घडत असतील तर आपण सावध राहिलं पाहिजे, घरात कुठेही अडच किंवा अडगळ राडा ठेवू नये. घराचे कोपरे स्वच्छ ठेवावेत. तसेच जर आपलं घर हे ग्रांउड लेव्हलला असेल तर आपल्या घराच्या आसपासचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे, घराच्या आसपास गवत वाढू देऊ नये. गवत वाढलेलं असेल तर साप दिसणार नाही, त्यामुळे देखील सर्पदंश होऊ शकतो.

तसेच अशा देखील काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असतात ज्या वनस्पतींच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप हा घरात येत नाहीत, तुम्ही अशा देखील काही उपाय योजना करू शकता. त्यावर सर्वात प्रभावी वनस्पती म्हणजे रानतुळस, रानतुळशीला प्रचंड असा उग्र वास असतो, या वासाचा सापांना त्रास होतो, त्यामुळे साप घरात येत नाहीत, तुम्ही या रानतुळशीच्या झाडाला आलेल्या मंजुळा एकत्र करून त्यांना छोट्या-छोट्या कापडामध्ये गुंडळून जिथे-जिथे साप येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी या छोट्या-छोट्या पोटल्या ठेवल्यास याच्या वासामुळे साप घरात प्रवेश करणार नाही, ग्रामीण भागांमध्ये आजही अनेक ठिकाणी साप घरात येऊ नये यासाठी हा उपाय केला जातो.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?