मोठी बातमी! उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? CJP चं आंदोलन सुरू असतानाच सर्व्हे समोर, धक्कादायक कल, भाजपला थेट…

दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. सीजेपीकडून सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. याचदरम्यान आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक सर्व्हे समोर आला आहे.

मोठी बातमी! उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? CJP चं आंदोलन सुरू असतानाच सर्व्हे समोर, धक्कादायक कल, भाजपला थेट...
Uttar Pradesh Assembly Election
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 4:56 PM

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या या राज्यात भाजपची सत्ता आहे. आतापासूनच उत्तर प्रदेशमधील प्रमुख पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरला देखील वेग आला आहे. सपाच्या तीन विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर समाजवादी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला. उत्तर प्रदेशमध्ये सपाने भाजपचे पाच नेते फोडले आहेत. दरम्यान एकीकडे दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं जेन झी सहभागी झाले आहेत. पुढच्या निवडणुकांमध्ये जेन झीची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. याचदरम्यान आता उत्तर प्रदेश निवडणुकीचा सर्व्हे समोर आला आहे. न्यूज 18 ने हा सर्व्हे केला आहे.

उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता हा सर्व्हे समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील जनतेला काय वाटतं? उत्तर प्रदेशमध्ये कोणाला सत्ता मिळणार? भाजपला किती जागा मिळू शकतात? इंडिया आघाडीचं उत्तर प्रदेशमध्ये काय होणार? या प्रश्नांची उत्तर या सर्व्हेमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व्हेमधून आश्चर्यचकित करणारे कल समोर आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येणार असल्याचं दिसून येत आहे. या सर्व्हेनुसार तब्बल 67 टक्के लोकांनी भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. 67 टक्के लोकांना राज्यात पु्न्हा एकदा भाजपचं सरकार हवं आहे. हा सर्व्हे इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Loading...

काय आहे सर्व्हेचा कल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचाच विजय होणार आहे, असा अंदाज या सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला आहे. जवळपास 67 टक्के लोकांनी भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 27 टक्के लोकांनी इंडिया आघाडी समाजवादी पार्टी, काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे पाच टक्के लोकांनी मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टीला पसंती दिली आहे. तर एक टक्के लोकांनी इतर पक्षांना पाठिंबा दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us