सगेळ विरोधात असतानाही जो पक्ष मोदींसोबत राहिला, त्याने अचानक बदलली भूमिका, NDA ला साथ देणारे आता CJP च्या बाजूने

दक्षिणेतील बड्या पक्षाच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. हा पक्ष सातत्याने मोदी सरकारचा समर्थक राहिला आहे. जेव्हा अख्ख्या विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला, तेव्हा सुद्धा ते मोदी सरकारच्या कार्यक्रमाला हजर होते.

सगेळ विरोधात असतानाही जो पक्ष मोदींसोबत राहिला, त्याने अचानक बदलली भूमिका,  NDA ला साथ देणारे आता CJP च्या बाजूने
PM Narendra Modi
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 19, 2026 | 11:12 AM

संसदेत भाजपं प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या भूमिकेत बदल होताना दिसतोय. निवडणूक आयोगाबद्दलच्या आपल्या जुन्या निर्णयावर त्यांनी दु:ख व्यक्त केलं. जगन मोहन रेड्डी यांनी सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन केलं आहे. डाव्या पक्षांसोबत समन्वय हे सुद्धा त्यामागे एक कारण असू शकतं. या बद्दल अधिकृतपणे काही म्हटलेलं नाही. जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला गत विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेला. लोकसभेतही त्यांचा पक्ष खास प्रदर्शन करु शकला नव्हता.

“आता आम्हाला दु:ख होतं. आता आम्हाला जाणीव होतेय की, त्या प्रक्रियेला सहमती देणं चुकीचं होतं. निवडणूक आयुक्ताची नेमणूक तीन सदस्यीय समिती करते. त्या समितीत पंतप्रधान, पीएमनी निवडलेला एक नेता आणि विरोधी पक्षाचा नेता असतो” असं रेड्डी बोलल्याचं मिडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. त्यांनी कायद्यात बदल आणि समितीमध्ये भारताच्या मुख्य न्यायाधीशाचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

Loading...

कुठल्या मुद्यावर समर्थन?

आम्ही नेहमीच मुद्याच्या आधारावर एनडीए सरकारचं समर्थन केलं आहे. आम्हाला असं वाटतं की, या मुद्यावर जनतेला सरकारकडून जास्त आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे असं YSRCP च्या नेत्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं. एनडीए सोबत आहोत किंवा भारतीय जनता पार्टी सोबत आहोत असं YSRCP पक्षाने जाहीरपणे म्हटलेलं नाही.

YSRCP ने कधी सरकारला साथ दिलीय?

2020 साली YSRCP पक्षाने कृषी कायद्याचं समर्थन केलं होतं. नंतर हा कायदा मागे घ्यावा लागलेला. वर्ष 2023 साली संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्यावेळी पक्षाचे नेते त्या कार्यक्रमात सहभागी झालेले. विरोधी पक्षांनी त्यावेळी कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला. नागरिकता संशोधन कायदा, अनुच्छेद 370 हटवण्याच्या मुद्यावरही YSRCP पक्षाने सरकारला पाठिंबा दिलेला. 2025 मध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी पी राधाकृष्णन यांना साथ दिलेली.

YSRCP ची भूमिका काय?

YSRCP ची डाव्या पक्षांसोबत चर्चा सुरु आहे, अशी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे. बेकायदेशीर पद्धतीने मताधिकार हिरावून घेतला असेल तर अशा लोकांना विरोधी पक्षाच्या नात्याने आम्ही साथ दिली पाहिजे असं मला वाटतं असं YSRCP पक्षाने म्हटलं आहे. जगन यांच्या पक्षाने आरोप केलाय की, त्यांचे लोकसभेतील नेते पीवी मिधुन रेड्डी यांना मारण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा आरोप आहे की, मिधुन यांनी स्थानिक निवडणुकी दरम्यान जमावाला आग लावण्यासाठी चिथावणी दिली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us