जिनपिंग यांची रहस्यमयी कार काळ्या कव्हरने का झाकली? चीनला नेमकं काय लपवायचंय?

दिल्लीतील ब्रिक्स परिषदेत शी जिनपिंग यांची रहस्यमयी Hongqi N701 लिमोजीन कार काळ्या कव्हरने झाकलेली दिसली. ही खास बुलेटप्रुफ कार राष्ट्रपतींसाठीच बनवली आहे. सुरक्षेची गोपनीयता राखण्यासाठी, वाहनाची माहिती गुप्त ठेवण्यासाठी, धूळ-पाऊस आणि उन्हापासून संरक्षण तसेच फोटो व्हायरल होऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली जाते.

जिनपिंग यांची रहस्यमयी कार काळ्या कव्हरने का झाकली? चीनला नेमकं काय लपवायचंय?
Xi Jinping car
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 5:19 PM

दिल्लीत सध्या ब्रिक्स समिट सुरू आहे. या परिषदेला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगही उपस्थित राहिले आहेत. यावेळी जिनपिंग यांची रहस्यमयी Hongqi N701 लिमोजीन कारला काळ्या कव्हरने झाकून रस्त्यावर आणण्यात आलं. या कारचे फोटो व्हायरल होत आहेत. Hongqi N701 ही चीनची खास बुलेटप्रुफ कार आहे. या कारची टेक्निक अत्यंत गुप्त ठेवली आहे. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग परदेश दौऱ्यात याच कारचा वापर करतात. नेमकी ही कार आहे काय? त्याचाच घेतलेला हा आढावा.

दिल्लीत चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सरकारी ताफ्यातील गाड्यांना काळ्या कव्हरने झाकून नेलं जात होतं. खास प्रकारच्या काळ्या कव्हरने झाकलेल्या या कारचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये या कारविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. ही कार एवढी झाकून का नेली जात आहे, याचं कुतुहूल निर्माण झालं आहे.

खास सीक्रेट कार

विशेष म्हणजे जिनपिंग यांच्या ताफ्यातील सर्व कार लोकांना दिसणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. खासकरून जिनपिंग यांची अत्यंत सीक्रेट आणि मजबूत Hongqi N701 लिमोजीन कार अत्यंत रहस्यमयरित्या नेण्यात आली होती. त्यामुळे या कारची जोरदार चर्चा सुरू आहे. जिनपिंग भारतात येण्यापूर्वीच त्यांची वाहने भारतात दाखल झाली होती.

काळ्या कव्हरमध्ये कार

परदेश दौऱ्यात सरकारी कार झाकून ठेवणं मुख्यत्वे संरक्षण आणि लॉजिस्टिकशी संबंधित बाब असते. राष्ट्रपतींची वाहने नेहमीच वेगळी पाठवली जातात. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चिनी राष्ट्रपतींच्या वाहनांना कार्गो विमानाने आणल्या नंतर अत्यंत सावधानतेने नेलं जातं. या कारची गोपनीयता ठेवण्यासाठी मजबूत शीट वा वाटरप्रूफ कव्हरने झाकली जाते. अनावश्यक दिखाऊपणा टाळण्यासाठी हे केलं जातं. तसेच या वाहनांचे फोटो व्हायरल होऊ नये. शिवाय वाहनांची धूळ, पाऊस आणि उन्हापासून काळजी घेतली जावी म्हणूनही कव्हरने झाकली जाते.

सुरक्षेसाठी कव्हर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे खास कव्हर लावले जाते. सुरक्षेचं कारणही त्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र, काळ्या रंगाच्या कव्हरमध्ये झाकलेली गाडी ही सामान्य लिमोजीन कार नसल्याचं लक्षात आल्याने अनेकांचं कुतुहूल वाढलं.

सीक्रेट लिमोजीन Hongqi N701

चिनी राष्ट्रपति शी जिनपिंग यांची Hongqi N701 ही कार चिनी ब्रँड Hongqi ने बनवलेली एक खास लिमोजीन कार आहे. या कारच्या नावाचा अर्थ रेड फ्लॅग असा होतो. Hongqi N701 ही काही सामान्य कार नाहीये. ही कार केवळ आणि केवळ चिनी राष्ट्रपतींसाठीच बनवलेली आहे. या कारची संपूर्ण माहिती सीक्रेट ठेवण्यात आलेली आहे. ही कार सुमारे 5.5 मीटर म्हणजे सुमारे 18 फूट लांब आहे. ही कार जेव्हा रस्त्यावरून चालते तेव्हा जगातील सर्वात बलाढ्य व्यक्ती कार म्हणून जात असल्याचं जाणवतं.

मजबूत सुरक्षा कवच

या कारला मजबूत सुरक्षा कवच आहे. यात बुलेट प्रुफ ग्लास, खास सुरक्षित चाकं आणि टायर लावलेले आहेत. स्फोट आणि केमिकल हल्ल्यातही ही कार टिकून राहते. मात्र, या कारबाबतची बरीचशी माहिती कंपनीने दिलेली नाही. यात 6.0-लीटरचे V12 इंजन लावण्यात आलेले आहे, त्याची सुमारे 408 हॉर्सपावरची क्षमता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us