AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळी 5:30 वाजता… iPhone 18 Pro आणि Max ची बुकिंग आजपासून; किमतीपासून ऑफरपर्यंत घ्या जाणून

iPhone 18 Pro आणि Pro Max ची प्री-बुकिंग आज (12 सप्टेंबर) संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू झाली आहे. 18 सप्टेंबरपासून विक्रीला सुरुवात होईल. खास कलर, स्टोरेज आणि Pro Max मॉडेलसाठी लवकर बुकिंग करणे महत्त्वाचे आहे, कारण उपलब्धता मर्यादित असू शकते. अ‍ॅपल स्टोअर्स आणि ईकॉमर्स चॅनलवर किंमती, ऑफर आणि बुकिंग प्रक्रिया उपलब्ध आहे.

संध्याकाळी 5:30 वाजता... iPhone 18 Pro आणि Max ची बुकिंग आजपासून; किमतीपासून ऑफरपर्यंत घ्या जाणून
iPhone 18 Pro and Max Pre-Booking Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 3:53 PM
Share

अ‍ॅपलाचा नवा iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी करण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कंपनी या दोन्ही फोनची प्री ऑर्डर बुकिंग आज 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू करत आहे. दोन्ही फोनची विक्री 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्हाला खास कलर, स्टोरेज वा Pro Max मॉडल खरेदी करायचा असेल तर प्री ऑर्डर करणं तुमच्यासाठी हा चांगला पर्याय असणार आहे. कारण हे दोन्ही मोबाईल लॉन्च होताच, काही वेळातच काही व्हेरियंटची उपलब्धता मर्यादित होणार आहे.

आज संध्याकाळी 5:30 वाजता

अ‍ॅपल आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून भारतात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची प्री-ऑर्डर घेणं सुरू करणार आहे. दोन्ही मॉडल ग्राहकांना 18 सप्टेंबर रोजी भारतीय ग्राहकांना मिळणार आहेत. अ‍ॅपलच्या ऑनलाइन स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअर अ‍ॅपच्याशिवाय प्रमुख रिटेल आणि ईकॉमर्स चॅनलमधूनही प्री ऑर्डर बुक करता येणार आहे. यात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, लोटस इलेक्ट्रॉनिक्स, विजय सेल्स आणि दुसऱ्या अधिकृत रिटेल पार्टनरचाही समावेश आहे. ऑफलाईन खरेदी करणारे ग्राहक अॅपल स्टोअर आणि अधिकृत रिटेल स्टोरमध्येही उपलब्धता पाहू शकणार आहेत. तर iPhone Duo नंतर येणार आहे. त्यासाठी प्री-बुकिंग 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 23 ऑक्टोबर रोजी त्याची विक्री होणार आहे.

असा करा फोन बुक

ग्राहकांना सर्वात आधी तुमचा पसंतीचे मॉडल, कलर आणि स्टोअरेज ठरवावं लागणार आहे. त्यानंतर अ‍ॅपलच्या ऑनलाइन स्टोअर, अ‍ॅपल स्टोअर अ‍ॅप वा आवडीच्या रिटेलर वेबसाईटवर जाऊन iPhone 18 Pro वा iPhone 18 Pro Max निवडावा लागणार आहे. त्यानंतर स्टोरेज आणि कलर निवडून पेमेंट, कॅशबॅक, ईएमआय आणि एक्सचेंजचा पर्याय पाहा. डीलिव्हरीची माहिती भरल्यानंतर पेमेंट वा रिटेलरची प्री-ऑर्डर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्री ऑर्डरसाठी ग्राहकांना 5 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, अजून प्री ऑर्डरमध्ये ग्राहकांना किती रक्कम द्यावी लागणार याची माहिती समोर आलेली नाही. खास व्हेरियंट घेण्यासाठी मात्र ग्राहकांना 5.30 वाजता तयार राहावे लागणार आहे.

किंमत किती

iPhone 18 Pro ची सुरुवातची किमत 1,64,900 रुपये आहे. तर iPhone 18 Pro Max ची किमत 1,79,900 रुपयांपासून सुरू होणार आहे. दोन्ही फोन 256GB, 512GB, 1TB आणि 2TB स्टोरेजचे असणार आहेत. iPhone 18 Proच्या 512GB मॉडलची किमत 1,89,900 रुपये, 1TB मॉडलची 2,39,900 रुपये आणि 2TB मॉडलची 3,14,900 रुपये आहे. तसेच iPhone 18 Pro Max च्या 512GB मॉडलची किमत 2,04,900 रुपये, 1TB ची 2,54,900 रुपये आणि 2TB मॉडलची किमत 3,29,900 रुपये आहे.

iPhone 18 Proची किमत

256GB: 1,64,900 रुपये

512GB: 1,89,900 रुपये

1TB: 2,39,900 रुपये

2TB: 3,14,900 रुपये

iPhone 18 Pro Max ची किमत

256GB: 1,79,900 रुपये

512GB: 2,04,900 रुपये

1TB: 2,54,900 रुपये

2TB: 3,29,900 रुपये

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर