AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता Z+ सुरक्षेसाठी महिला कमांडोही रिंगणात, CRPF ची शस्त्रधारी टीम सज्ज! अमित शहांसह VIP व्यक्तीच्या सुरक्षेत

नवी दिल्लीः देशातील अति विशेष व्यक्तींच्या सुरक्षेला बळकटी देणाऱ्या Z+ सुरक्षा कवचात आता महिला कमांडोचाही (Woman Commandos) समावेश असेल. सीआरपीएफने विशेष प्रशिक्षण (CRPF Training) देत 32 महिला कमांडोंची तुकडी तयार केली असून ही टीम लवकरच तैनात केली जाईल. त्यामुळे आता अमित शहा (Amit Shah), सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी, प्रियंका गांधी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या […]

आता Z+ सुरक्षेसाठी महिला कमांडोही रिंगणात, CRPF ची शस्त्रधारी टीम सज्ज! अमित शहांसह VIP व्यक्तीच्या सुरक्षेत
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 23, 2021 | 2:10 PM
Share

नवी दिल्लीः देशातील अति विशेष व्यक्तींच्या सुरक्षेला बळकटी देणाऱ्या Z+ सुरक्षा कवचात आता महिला कमांडोचाही (Woman Commandos) समावेश असेल. सीआरपीएफने विशेष प्रशिक्षण (CRPF Training) देत 32 महिला कमांडोंची तुकडी तयार केली असून ही टीम लवकरच तैनात केली जाईल. त्यामुळे आता अमित शहा (Amit Shah), सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी, प्रियंका गांधी, मनमोहन सिंग यांच्यासारख्या VIP नेत्यांच्या पाठीशी महिला कमांडो उभ्या असलेल्या आपल्याला दिसू शकतील.

10 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 महिला कमांडोंना व्हीआयपी सुरक्षा, ड्यूटी, निःशस्त्र युद्ध, विशेष शस्त्रांद्वारे फायरींग आदी गोष्टींचे 10 आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यापासून महिला कमांडोंना तैनात केले जाईल. सुरुवातीला दिल्लीतील ज्या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा कवच आहे, त्यांच्यासोबत या कमांडोंना तैनात केले जाईल. या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वढेरा, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास आणखी डझनभर लोकांना क्रमा-क्रमाने महिला कमांडोंची तुकडी संरक्षण देईल. महिला कमांडोंना या व्हीआयपी व्यक्तींच्या गृह सुरक्षा टीमचे सदस्य म्हणून तैनात केले जातील. तसेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांदरम्यान आवश्यकता असल्यास नेत्यांसोबत या कमांडोंना दौऱ्यावरही पाठवले जाईल.

Z+ सुरक्षा कोणाला असते?

सध्या देशात फक्त पाच व्यक्तींना व्हीआयपी झेड प्लस सुरक्षा दिली जाते. सीआरपीएफच्या वतीने हे सुरक्षा कवच प्रदान केले जाते. यात पाच व्यक्तींमध्ये गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (पत्नी गुरुशरण कौरसह), काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा समावेश आहे. सुरक्षा विषयावरील ब्लू बुकनुसार, झेट प्लस कॅटेगरीतील सुरक्षेत 10 आर्म्ड स्टॅटिक गार्ड, 6 PSO, 24 सैनिक, 2 एक्सकॉर्ट, 5 वॉचर्स दोन शिफ्ट मध्ये असे तैनात असतात. तसेच इनचार्ज म्हणून इन्स्पेक्टर तैनात असतात.

इतर बातम्या-

तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का?, झाली दादांकडून चूक; सुधीर मुनगंटीवारांचे नवाब मलिकांना चिमटे कशासाठी?

ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड, आंबेडकर आक्रमक, म्हणाले…

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!