BLOG विष्णू, सूर्य आणि वाघही

पणजी: गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि बंडखोर कवी विष्णू सूर्या वाघ यांचं दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथं निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. मराठी साहित्यात अनेक दिग्गज कवी लेखक होते, आहेत आणि होतीलही. मात्र विष्णू सूर्या वाघ नावाचं गोवान रसायन काहीतरी वेगळंच होतं. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, शिल्प आदी कलांवर वाघ यांचे प्रभुत्व होते. वाघ सरांचं दक्षिण […]

BLOG विष्णू, सूर्य आणि वाघही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पणजी: गोवा विधानसभेचे माजी उपसभापती आणि बंडखोर कवी विष्णू सूर्या वाघ यांचं दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथं निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. मराठी साहित्यात अनेक दिग्गज कवी लेखक होते, आहेत आणि होतीलही. मात्र विष्णू सूर्या वाघ नावाचं गोवान रसायन काहीतरी वेगळंच होतं. साहित्य क्षेत्रासह संगीत, नाट्य, चित्र, शिल्प आदी कलांवर वाघ यांचे प्रभुत्व होते. वाघ सरांचं दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये निधन झालं. मात्र या बातमीनंतर एक प्रसंग किंवा घटना डोळ्यासमोर उभी राहिली. कदाचित याच घटनेनंतरच त्यांची मरण यातना जिवंतपणी सुरु झाली.

एका बाजूला मराठी साहित्यात अनेक दिग्गज “मी माझा” या तत्वावर जगत असतात. माझ्या कविता लोकांपुढे सादर करायला मिळाल्या की झालं. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषा जतनाची मोठी भाषणं द्यायची आणि आपली बातमी वर्तमान पत्रात छापून आली नाही की आयोजकांवर डाफरायचं. पण मोठे कार्यक्रम हाती घेऊन कविता किंवा साहित्य पुढे नेण्याची तळमळ फक्त हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या लोकांमध्ये दिसते. हिंदू पुराणानुसार विष्णूची जबाबदारी ही ब्रम्ह देवानी निर्माण केलेली सृष्टी जतन करण्याची, सांभाळण्याची जबाबदारी असते. मराठी कविता पुढे नेण्यासाठी जीवाची बाजी लावणारा हा मराठी साहित्यातील विष्णू होता. तळपती लेखणी असलेला तेजस्वी सूर्य होता आणि लिखाणात, राजकारणात आणि आयोजनात वाघ.

तर विष्णू सूर्या वाघ यांच्या अकाली निधनाला कवितेचं प्रेम जबाबदार आहे असं मला वाटतं. साधारणपणे 2 वर्षांपूर्वी विष्णू सूर्या वाघ यांनी गोव्याच्या कला अकादमित “काव्य होत्र” नावाचा कवितेचा कुंभमेळा आयोजित केला होता. कदाचित तोच त्यांचा काव्य प्रवासातील शेवटचा मोठा कार्यक्रम.  देशभारतून आलेल्या वेगवेगळ्या कवींनी सतत 72 तास कवितांचं वाचन करून अनेक विक्रम केले. महाराष्ट्राचे लाडके कवी आणि कविता पुढे नेण्यासाठी सतत अग्रेसर असणाऱ्या अरुण म्हात्रे सरांनी या कार्यक्रमात मोठी जबाबदारी पार पाडली होती. अनेक कवींना मुंबई ते गोवा आणि परत मुंबई हा विमान प्रवास, थ्री स्टार हॉटेलमध्ये उत्तम राहण्याची व्यवस्था आणि इतकं करुन हातात पैसे उरतील इतकं वजनदार मानधन. हे धनुष्य पेलायला वाघाचंच काळीज लागतं. तर या कार्यक्रमात आमच्या “न्यूज लेस” कविता या कार्यक्रमाला आमंत्रण होतं. तिथे गेल्यावर विष्णू सूर्या वाघ आमच्याशी गप्पा मारत होते. गप्पा मारताना समजलं की वाघ सरांना नुकताच अटॅक येऊन गेला आहे. डॉक्टरांनी फक्त आरामच करायला सांगितला आहे. असं असूनसुद्धा हा माणूस प्रचंड ताण घेऊन कवितेसाठी झटत होता.

कार्यक्रमानंतर लगेचच काही दिवसांत बातमी आली की मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये विष्णू सूर्या वाघ यांना अॅडमिट केलं आहे. त्यानंतर ते बरे झालेच नाहीत. आणि आज ते आपल्यात नाहीत. वाघ सरांच्या जाण्याने साहित्यातला विष्णू, सूर्य आणि वाघ गेल्याची भावना माझी वैयक्तीक आहे. वाघ सरांना विनम्र आदरांजली!

पंकज दळवी, कवी आणि पत्रकार (टीव्ही 9)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.