या खलनायकाने घेतलेलं फक्त 11 रुपये मानधन, 118 कोटींचा चित्रपट ठरलेला प्रचंड फ्लॉप, झालेलं 100 कोटींचं नुकसान
118 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या हा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप. झालेलं 100 कोटींचं नुकसान. खलनायकाने घेतलं होतं फक्त 11 रुपये मानधन.

बॉलिवूडमध्ये मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणजे हमखास यश असे समीकरण अनेकदा फेल ठरले आहे. प्रचंड स्टारकास्ट, मोठे दिग्दर्शक आणि भव्य निर्मिती असूनही काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 'बॉम्बे वेल्वेट'.

2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील सर्वात चर्चित आणि महागड्या प्रोजेक्टपैकी एक मानला जात होता. मात्र रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारले आणि तो बॉक्स ऑफिसवर मोठा डिजास्टर ठरला.

'बॉम्बे वेल्वेट' मध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात 1960 च्या दशकातील मुंबईची पार्श्वभूमी दाखवण्यात आली होती. 118 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता, त्यामुळे निर्मात्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

या चित्रपटातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे करण जौहरने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याने फक्त 11 रुपये मानधन घेतल्याची चर्चा होती. त्याचा निगेटिव्ह रोल प्रेक्षक आणि समीक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला होता.

या चित्रपटाकडून बॉलिवूडला मोठ्या यशाची अपेक्षा होती पण रिलीज झाल्यानंतर तो वर्षातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला. आजही हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या आर्थिक अपयशांपैकी एक म्हणून ओळखला जातो.