26 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकून महिला आजही नवऱ्याला मारतात टोमणे, आजही ट्रक, रिक्षामध्ये ऐकायला मिळतं

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी प्रेम, भाऊ-बहिणीच्या नात्यावर बनली आहे. मात्र, असं एक गाणं आहे जे ऐकून महिला आपल्याला नवऱ्याला टोमणे मारतात. अलका याग्निक यांच्या आवाजामुळे ठरलं प्रचंड सुपरहिट.

| Updated on: Oct 24, 2026 | 3:39 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीत मैत्री, प्रेम आणि भाऊ-बहिणीच्या नात्यावर अनेक गाणी तयार झाली आहेत. मात्र, सवतीवर आधारित गाण्यांनीही एकेकाळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत मैत्री, प्रेम आणि भाऊ-बहिणीच्या नात्यावर अनेक गाणी तयार झाली आहेत. मात्र, सवतीवर आधारित गाण्यांनीही एकेकाळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

2 / 5

असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘बंगला गाडी, दिल मत देना मेरी सौतन को’. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला लोकप्रिय झालेलं हे गाणं त्या काळात ऑटो रिक्षा, बस आणि ट्रकमध्येही मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळायचं.

3 / 5

आजही या गाण्याची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळतं. ‘दिल मत देना मेरी सौतन को’ या गाण्याला अलका याज्ञिक यांनी आपला मधुर आवाज दिला आहे. मजेशीर शब्दरचना, ठेका आणि हटके विषय यांमुळे हे गाणं त्या काळात विशेष गाजलं.

4 / 5

हे गाणं 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छुपा रुस्तम : ए म्युझिकल थ्रिलर’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात संजय कपूर आणि मनीषा कोईराला यांची केमिस्ट्री आणि खेळकर अंदाज पाहायला मिळतो.

5 / 5

चित्रपटाच्या निर्मितीला आणि प्रदर्शनाला अनेक वर्षांचा कालावधी लागला होता. अखेर 2001 मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. उपलब्ध माहितीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 9.46 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us